गुजरातच्या चार वर्षीय मुलीला युट्यूबचा ‘सिल्व्हर प्ले बटन’ अॅवार्ड


राजकोट – युट्यूब या दिग्गज सोशल मीडिया कंपनीला गुजरातमधील ४ वर्षा वयाच्या ध्यानीने आपल्या बुद्धीमत्तेची दखल घ्यायला भाग पाडले आहे. यु ट्यूबवर ध्यानीचे ‘द यानी’ ट्युब या चॅनेलमधून सामाजिक संदेश देणारे व्हिडिओ चांगलेच लोकप्रिय आहेत. यु ट्युबने सिल्वर प्ले बटनने ध्यानीला सन्मानीत केले आहे.

आपले कौशल्य दाखवून ध्यानीने अनेकांना अंचबित केले आहे. ती व्हिडिओत कधी वृद्ध स्त्री होते, तर कधी डॉक्टर म्हणून भूमिका करते. प्रत्येक वेळी विषयाचे नाविन्य व तिची खट्याळ भूमिका अनेकांच्या पसंतीस पडली आहे. ध्यानी व तिचे वडीत धवल जानी यांनी यु ट्युबकडून सिल्व्हर प्ले बटन अॅवार्ड मिळाल्यानंतर नेटीझन्सचे आभार मानले आहेत. धवल यांनी सुरुवातीला ध्यानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी यु ट्यूबवर ध्यानीचे चॅनेल सुरू केले होते. ८० लाखांहून अधिक नेटीझन्सने तिच्या व्हिडिओला पसंत केले आहे. तर २५ हजारांहून अधिक जणांनी तिच्या यु ट्युब चॅनेलला सबस्क्राईब केले आहे.

Leave a Comment