१६ जुलै ते १८ जुलै दरम्यान अॅमेझॉनचा प्राईम सेल


नवी दिल्ली – अॅमेझॉनने ऑनलाईन खरेदीतील सर्वात मोठा ठरणारा प्राईम सेल आणला असून १६ जुलै दुपारी ३ पासून १८ जुलै दुपारी ३ वाजेपर्यंत केवळ ३६ तासांसाठी हा सेल असणार आहे. अनेक नवे प्रोडक्ट्स आणि ग्राहकांना विविध उत्पादनांवर यामध्ये भरगच्च सवलत दिली जाणार आहे.

२०१८ च्या ‘प्राईम सेल डे’ची घोषणा जरी अॅमेझॉनने केली असली तरी केवळ प्राईमचे सभासद असणाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. वन प्लस ६ हा ८ जीबी व १२ जीबी स्टोअरेजस असलेला स्मार्टफोन सेलदरम्यान ग्राहकांसाठी एक्सक्ल्युझीव्ह उपलब्ध केला जाणार आहे.

प्राईम डे सेलमध्ये वेगवेगळी तब्बल २०० उत्पादने लॉन्च होणार आहेत. त्यामध्ये वनप्लस, नेस्ले, नेसप्लस, एचपी, एसर यासारख्या ब्रँडचा समावेश असणार आहे. हा सेल ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. विशेषत: मोबाईल फोन व अॅक्सेजरीजवर ४० टक्क्यापर्यंत सवलत मिळणार आहे. टीव्ही, किचनमधील उत्पादने अशा वस्तूंवर ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सवलत दिली जाणार आहे.

Leave a Comment