ग्रुपमधून न काढताही सदस्याला गप्प करण्याचे अधिकार मिळाले अॅडमिनला


व्हॉट्सअॅपने आपले नवे फिचर दाखल केले असून अॅडमिनला ग्रुपमध्ये पोस्ट करायचा अधिकार कुणाला असेल याचे नियंत्रण देण्यात आले आहे. सेंड मेसेजेस हा नवा पर्याय ग्रुप सेटिंगमध्ये देण्यात आला असून ठराविक सदस्यांना पोस्ट करण्याचा अधिकार आहे की फक्त अॅडमिनला आहे की सगळ्या सदस्यांना आहे याची निवड अॅडमिनला करता येणार आहे. अनेक त्रासांपासून या नव्या फ़ीचरमुळे सुटका होणार आहे. नको त्या ग्रुपमध्ये अनेकजण भलतेच मेसेज टाकतात जाहिरातबाजी करतात. तसेच अफवाही पसरवतात. आता अॅडमिनला या सगळ्यावर नियंत्रण ठेवता येणार असल्यामुळे एखाद्या त्रासदायक सदस्याला ग्रुपमधून न काढताही गप्प करण्याचे अधिकार अॅडमिनला मिळाले आहेत.

‘Only Admins’ हे सेटिंग व्हॉट्सअॅपतर्फे आणले जाणार असून ग्रुप अॅडमिन ज्यामध्ये स्वतःच मेसेज टाकायचे, कोणी मेसेज पोस्ट करायचे याचा निर्णय घेऊ शकणार आहे. अॅडमिनला त्यासाठी ओन्ली अॅडमिन हे सेटिंग सिलेक्ट करावे लागणार आहे. या संदर्भातली माहिती व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजेसवर या नव्या सेटिंगमुळे अॅडमिनचे नियंत्रण राहणार आहे.

अनेकदा भरपूर अफवा व्हॉट्सअॅप ग्रुपवरून पसरवल्या जातात. न वाचताच अनेक मेसेजेस फॉरवर्ड केले जातात. आत्तापर्यंत या सगळ्यावर काहीही नियंत्रण नव्हते, पण आता व्हॉट्सअॅपने आणलेल्या नव्या फिचरमुळे या सगळ्यावर अंकुश बसण्यास मोठी मदत होणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन हा त्या ग्रुपचा बिग बॉस असणार आहे तोच ठरवू शकणार आहे की ग्रुपवर नेमका कोणता मेसेज पोस्ट केला जाईल.

Leave a Comment