घरबसल्या मालामाल करतील ‘या’ वेबसाईट्स !


मुंबई : पार्ट टाईमसाठी किंवा एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी काही लोक अनेक पर्याय शोधत असतात. पण घरबसल्या आणि इंटरनेटच्या मदतीने पैसे कमवण्यासाठी काही वेबसाईट्स खूपच प्रसिद्ध आहेत. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (URL)देखील असाच एक पर्याय असून महिन्याभरात URL च्या मदतीने इंटरनेटवर हजारोंची कमाई केली जाऊ शकते.

तुम्ही कोणतीही लिंक यूनिफार्म रिसोर्स लोकेटरमुळे शेअर करू शकता. URL सोशल मीडियावरही ट्रेंड करते. इंटरनेटवर लहान स्वरूपातील यूआरएल सहज रिडिरेक्ट केले जाऊ शकतात. याच्या मदतीने इंटरनेटवर व्हायरल होणारे मेसेज, व्हिडिओ, फोटोदेखील व्हायरल केले जातात. गूगलसारखी कंपनीदेखील यूआरएल लहान करण्यासाठी सेवा देते.

आपण सोशल मीडियावर इंटरनेटवरील अनेक गोष्टी सहज शेअर करतो. या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला मोठ्या स्वरूपातील युआरएल छोट्या स्वरूपात बदलून ते सोशल मीडियावर शेअर करणे आवश्यक आहे. तुम्ही शेअर केलेल्या युआरएलवर फ्लॅश होणार्‍या जाहिराती जितके युजर्स पाहतील त्यावर तुम्हाला काही टक्के पेमेंट मिळणार आहे. कमेंट, लाईक्स आणि व्हिजिबिलिटीच्या प्रमाणावर पेमेंट ठरवले जाते.

सर्वात जास्त Adf.ly या वेबसाईटला विश्वसनीय मानले जाते. तुम्ही येथे युआरएल शॉर्ट करून पैसे कमवू शकता. अनेक फीचर्स Adf.ly वर उपलब्ध आहेत. कमीत कमी ५ डॉलरचे पेमेंट PayPalअकाऊंटमध्ये येते. त्याचबरोबर तुम्ही शेअर केलेल्या युआरएलवर किती हिट्स मिळाले याचीदेखील माहिती मिळते. पेमेंटचा रेट हा प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा आहे. भारतामध्ये प्रति १००० व्ह्युजवर १.०९ डॉलर म्हणजेच ७०.८५ रूपये या हिशोबाने पैसे मिळतात. याबाबत तुम्ही तुमच्या मित्राला रेफर केल्यास २०% कमिशनदेखील मिळवू शकता.

युआरएल लहान स्वरूपात करण्यासाठी Adv.li या वेबसाईटवर एक ठराविक रक्कम मिळते. या वेबसाईटवर एकावेळेस १०० किंवा त्यापेक्षा अधिक युआरएल लहान करता येऊ शकते. या वेबसाईटवर परफॉर्मिंग मीटरद्वारा युआरएलचा परफॉर्मन्सदेखील पाहिला जाऊ शकतो. भारतामध्ये यामधून मिळणारी रक्कम कमी आहे. भारतामध्ये एका लिंकवर १०० व्हूज मिळाल्यानंतर केवळ ०.४१ डॉलर म्हणजे २६.६५ रुपये मिळतात.

त्याचबरोबर LinkBucks या वेबसाईटच्या मदतीनेदेखील युआरएल छोटा केला जाऊ शकतो. तुम्ही शेअर केलेल्या लिंकवर मिळणार्‍या लाईक्स पाहून कंपनी त्यावर पेमेंट ठरवतात. वेबसाईट द्वारा शेअर केलेल्या युआरएलमुळे तुम्हांला कमीत कमी १० डॉलर PayPal अकाऊंटमध्ये मिळू शकतात. ही वेबसाईट भारतामध्ये ०.९० डॉलर म्हणजेच ५८.५ रूपये प्रति १००० व्ह्यूज याप्रमाणे पेमेंट करते.

Leave a Comment