आता फोनच्या गॅलरीत दिसणार नाहीत व्हॉट्सअॅपवरील ‘नकोशे’ फोटो, व्हिडीओ !


आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपमुळे अनेक नको असलेल्या फोटो आणि व्हिडीओ फाइल येतात. तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये या फाइल थेट सेव्ह होतात. त्यामुळे फोनची मेमरी संपते आणि फोनचा स्पीडदेखील कमी होतो. पण व्हॉट्सअॅपने या समस्येवर उपाय म्हणून एका नव्या फिचरचा समावेश केला आहे. या फिचरचे नाव मीडिया व्हिजिबिलिटी असे आहे. हे फिचर व्हॉट्स अॅपच्या बीटा व्हर्जन २.१८.१९४मध्ये देण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपवरील फाइल्स आता या फिचरमुळे थेट तुमच्या गॅलरीमध्ये जाणार नाहीत किंवा कोणत्या फाइल्स गॅलरीमध्ये जाव्या अथवा नको ते आता तुम्हाला ठरवता येणार आहे.

कोणा एका व्यक्ती अथवा ग्रुपवरुन येणाऱ्या मीडिया फाइल्स या फिचरद्वारे तुम्ही रोखू शकतात. व्हॉट्सअॅपवर हे फिचर गेल्या महिन्यात आलेल्या फिचरचाच एक भाग आहे, पण हे फिचर लेटेस्ट व्हर्जनमध्ये देण्यात आले नव्हते. या फिचरच्या सेटिंगसाठी त्यावेळी युजरला फोनच्या डेटा आणि स्टोरेज सेटिंगमध्ये जावे लागत होते आणि सर्व कॉन्टॅक्टसाठी एकसाथ हाइड आणि शोचा पर्याय होता. पण हे फिचर आता तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फो आणि ग्रुप इन्फो येथे देण्यात आले आहे. हे फिचर कॉन्टॅक्ट आणि ग्रुप इन्फोमध्ये आल्यामुळे तुम्ही एखाद्या खास कॉन्टॅक्टकडून येणाऱ्या मीडिया फाइल्स लपवू शकतात. युजरने यासाठी कॉन्टॅक्ट इन्फोमध्ये जाऊन पाहिजे त्या कॉन्टॅक्टच्या मीडिया व्हिजिबिलिटीला नो हा पर्याय निवडावा. महत्त्वाचं म्हणजे बिटा व्हर्जनमध्ये मीडिया व्हिजिबिलिटी फिचर बाय डिफॉल्ट सुरू असेल.

Leave a Comment