आता गुगल सांगणार रुग्णाचे आयुर्मान


कोणीही एखाद्या माणसाचा मृत्यू कधी होईल हे अचूक सांगू शकत नाही. तसेच अद्यापही तंत्रज्ञानाच्या युगात काही प्रश्नाची उत्तरे शोधण्यात आपल्याला यश मिळालेले नाही. पण, यापुढे कदाचित रुग्णाच्या मृत्यूबाबात मात्र योग्य भाकीत वर्तवणे शक्य होणार आहे. कारण असे एक टुल गुगलने तयार केले आहे, ज्याच्या मदतीने रुग्णाचे एकूण आयुर्मान समजू शकते. गुगलंचे हे टुल रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची माहिती पडताळून रुग्णाची वाचण्याची किंवा दगावण्याची शक्यता किती असेल याची माहिती देणार आहे.

ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत आर्टिफिशल इंटेलिजेंसचे मुख्य अधिकारी जेफ डीन यांनी या उपकरणाची माहिती दिली आहे. या टूलवर जेफ डीन यांचा चमू अधिक संशोधन करत आहे. रुग्णालयात एखादा रुग्ण आल्यानंतर त्याच्या सगळ्या माहितीची पडताळणी हे टुल करणार आहे त्याचप्रमाणे रुग्णालयात हा रुग्ण किती दिवस राहिल, तो पुन्हा कधी येईल, जर तो दुर्धर आजाराने ग्रस्त असेल तर त्याची जगण्याची शक्यता किती असेल यांसारख्या अनेक प्रश्नाची उत्तर हे टुल देणार आहे.

गुगलने आपल्या संशोधन पत्रात काही दिवसांपूर्वी या टुलच्या कार्यक्षमतेचा उल्लेख केला होता. या टुलने कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असलेली ही महिला जगण्याची शक्यता केवळ १९% असल्याचे भाकीत वर्तवले होते आणि काही दिवसांतच तिचा मृत्यूदेखील झाला होता. त्यामुळे हे टुल रुग्णाला अधिक फायदेशीर ठरणार असल्याचा गुगलचा दावा आहे.

Leave a Comment