अनुकृती वास बनली फेमिना मिस इंडिया २०१८


मुंबईत वरळी येथे पार मंगळवारी रात्री उशिरा पार पडलेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत यंदा तामिळनाडूच्या अनुकृती वास हिने मिस इंडियाचा ताज जिंकला आहे. या स्पर्धेसाठी २९ स्पर्धक होते त्यात अनुकृती विजयी ठरली. मिस वर्ल्ड मानुषी छील्लर हिने मिस इंडियाचा ताज अनुकृतीच्या मस्तकावर ठेवला. देशातील या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत हरियाणाची मीनाक्षी चौधरी फर्स्ट रनर अप झाली तर आंध्रची श्रेया राव सेकण्ड रनर अप ठरली.

या कार्यक्रमाला बॉलीवूड तारे तारकांची उपस्थिती लक्षणीय होती. यात माधुरी दीक्षित, करीना कपूर आणि जॅकलिन फर्नांडीस यांनी डान्स परफॉर्मन्स दिला. करन जोहर याने निवेदन केले.

नवी मिस इंडिया अनुकृती खेळाडू आणि डान्सर आहे. तिला बाईक चालविण्याचा छंद आहे आणि भविष्यात सुपरमॉडेल बनण्याची तिची इच्छा आहे.

Leave a Comment