आयुर्वेदिक आहारपद्धती म्हणजे नेमके काय?


प्रत्येक अन्नपदार्थाचा स्वतःचा असा एक खास गुणधर्म असतो. म्हणूनच तो अन्नपदार्थ कसा खाल्ला जावा ह्यालाही आयुर्वेदामध्ये महत्व दिले गेले आहे, कारण खाल्ल्या गेलेल्या प्रत्येक पदार्थाचा त्या जीवाच्या शारीरिक आणि मानसिक क्रिया कलापांवर चांगला किंवा वाईट प्रभाव पडत असतो. आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे आहार घेतल्यास त्यामुळे शरीरामध्ये समरसता आणि सबलता निर्माण होते. आयुर्वेद हे ‘आयुचे विज्ञान’ असल्याने जीवनाच्या प्रत्येक टप्प्याशी अगदी जवळून निगडित आहे.

आयुर्वेदानुसार शरीराचे कार्य कफ, वात आणि पित्त ह्या तीन तत्वांवर अवलंबून असते. ह्या तीनही तत्वांचे शरीरातील संतुलन उत्तम असले, तर मनुष्य निरोगी राहू शकतो. मात्र ह्या तीनही तत्वांमध्ये असंतुलन निर्माण झले, तर शरीराचा क्षय होऊ लागतो, आणि शरीरामध्ये निरनिराळे रोग उत्पन्न होऊ लागतात. आपण घेत असलेले भोजन, आपण राहतो त्या ठिकाणचे हवामान, आपली मानसिक अवस्था आणि आपले वय ह्या गोष्टींमुळे आपल्या शरीरातील कफ, वात, आणि पित्त ही तत्वे प्रभावित होत असतात. ह्यामध्ये, भोजन हा महत्वाचा भाग आहे, कारण आपल्या शारीरिक क्षमतेचा आणि मानसिक अवस्थेचा ह्याच्याशी जवळचा संबंध आहे. आपण दिवसभर करीत असलेल्या कामांसाठी आपल्या शरीरातील ऊर्जा खर्च होत असते. ही ऊर्जा आपल्याला आपण घेत असलेल्या आहारातून मिळत असते. ह्या निसर्गनियम असून, ह्याच्या क्रमामध्ये कधीही कसलाही बदल होत नाही.

सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ आणि त्यांची शारीरिक तत्वांबरोबर एकरूपता ह्या सिद्धांतावर आयुर्वेदिक आहारपद्धती अवलंबून आहे. आयुर्वेदानुसार, ह्या धरतालावरील सर्व पदार्थ पंचमहाभूतांपासून बनलेले असून, आपले शरीर आणि भोजन देखील पंचमहाभूतांनी बनलेले आहे. आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूते कफ (जल आणि पृथ्वी), वात (आकाश आणि वायू), व पित्त (अग्नी) ह्या रूपांमध्ये सामाविलेली असतात. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी ह्या तीनही तत्वांमध्ये संतुलन राहील असा आहार घेणे गरजेचे आहे. तसेच भोजन घेताना ते आपल्या आवडत्या ठिकाणी केले जाणे आवश्यक आहे. भोजनाचा वेग जास्त नसावा, तसेच मंदही नसावा, तसेच भोजन करताना गप्पा मारणे किंवा इतर काही करणे टाळायला हवे, भोजन करीत असताना संपूर्ण लक्ष भोजनावर केंद्रित हवे असे आयुर्वेद सांगतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment