ही आहेत जगातील काही प्रसिद्ध चित्रपट संग्रहालये


चित्रपटप्रेमींची संख्या जगात कमी नाही. फर्स्ट शो पाहण्यात धन्यता मानणारे अनेक चित्रपटप्रेमी आपल्या पाहण्यात असतात. चित्रपट शौकीन केवळ चित्रपटाचे वेडे असतात असे नाही तर चित्रपटाशी संबंधित गोष्टी, वस्तू यांचेही त्यांना आकर्षण असते. अश्या लोकांसाठी चित्रपट संग्रहालये म्हणजे पर्वणीच. जगात अनेक ठिकाणी अशी संग्रहालये आहेत. त्यातील काहीची माहिती आमच्या वाचकांसाठी

चीनच्या राजधानी बीजिंग येथे असलेले नॅशनल फिल्म म्युझियम जगातील मोठे संग्रहालय अमाणले जाते. ६५ एकर परिसरात ते पसरलेले असून २००५ साली ते उभारले गेले आहे. येथे १५०० फिल्म्स प्रिंट, फोटो पाहायला मिळतात तसेच येथे प्रदर्शनाचे अनेक हॉल आहेत. दरवर्षी मोठ्या संखेने येथे पर्यटक भेट देतात.


लंडनमध्ये मुव्हीयम ऑफ सिनेमा नावाने असलेल्या संग्रहालयात फिल्म सेट्स, कॉश्च्यूम अश्या सिनेमाशी संबंधित अनेक वस्तू पाहायला मिळतात. २००८ साली हे संग्रहालय सुरु झाले आहे.


फ्रांसमध्ये पॅरीस येथे असलेले म्युझियम ऑफ सिनेमा हे संग्रहालय १९३६ साली बनले. अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या मूळ प्रिंट येथे जतन केल्या गेल्या आहेत तसेच फ्रेंच सिनेमाचा इतिहास येथे समजून घेता येतो.


जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले हॉलीवूड चित्रपट संग्रहालय हॉलीवूड सिटी येथे आहे. हॉलीवूड म्युझियम ही सिनेजगताची जणू राजधानिच. येथे सिनेमा संदर्भातील सर्व गोष्टी म्हणजे कॅमेरे, पोशाख, जुने चित्रपट, फोटो पाहायला मिळतात. दरवर्षी सरासरी ५० लाख पर्यटक येथे भेट देतात.

Leave a Comment