आयसीआयसीआयने सुरु केल्या व्हॉटस अप बँकिंग चाचण्या


कोटक महिंद्रच्या पाठोपाठ खासगी क्षेत्रातील बडी बँक आयसीआयसीआयनेही व्हॉटस अप बँकिंग साठी चाचण्या सुरु केल्याचे समजते. सध्या हे फिचर निवडक ग्राहकांसाठी सुरु केले गेले असून येत्या महिन्याभरात ते देशभर सुरु होईल असे सांगितले जात आहे. या सेवेमुळे ग्राहकांसोबत संपर्क वाढविणे सुलभ होणार आहे असे बँकेचे म्हणणे आहे. या सेवेमुळे ग्राहकांना अॅलर्ट मेसेज व्हॉटस अपवर मिळणार आहे.

ऑनलाईन मुव्ही बुकिंग वेबसाईट बुक माय शोने सर्वप्रथम व्हॉटस अप प्लॅटफॉर्मचा वापर सुरु केला होता. कोटक महिंद्र बँकेने मंगळवारी व्हॉटस अप पेमेंट फिचरच्या चाचण्या सुरु करून देशातील अशी सेवा देणारी पहिली बँक बनण्याचा मान मिळविला होता. ही बँक तिच्या ८११ ग्राहकांना डिजिटल वेलकम कित देणार असून हे कित बँकेच्या व्हेरीफाईड नंबरने ग्राहकांना पाठविले जाणार आहे. यात ग्राहकांना मिळणाऱ्या फीचर्सचे फायदे सांगितले जातील.

Leave a Comment