असहाय्य आणि गरीबांवर नि: शुल्क उपचार करणारा पुण्याचा अवलिया डॉक्टर


पुणे – महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या एका डॉक्टरने बेघर, असहाय्य आणि गरीब जणांवर नि: शुल्क उपचार करून डॉक्टर हा जगातील दुसरा ईश्वर ही म्हण सत्यात उतरवली आहे.

अभिजीत सोनावने असे या अवलिया डॉक्टरचे नाव असून यासेवेबाबत ते म्हणतात, आर्थिकदृष्ट्या जे लोक संपन्न आहेत, ते कोठेही उपचार करू शकतात. पण गरीब लोक कोठे उपचार घेणार ? मी हे पाहून गरिबांची सेवा करण्यास प्रारंभ केला. सोमवार ते शनिवार सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते बेघर, असहाय्य आणि गरीब जणांवर उपचार करतात. त्याचबरोबर गरज वाटल्यास ते त्यांना सरकारी रुग्णालयातही दाखल करतात.

सोनावने म्हणाले, गरिबांची सेवा करण्यासाठी ते ‘सोहम ट्रस्ट’देखील चालवतात. ज्या लोकांची ते मदत करतात, त्यातील अनेक लोक त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे बनले आहेत. माझी समाजाची सेवा करण्याची ही पद्धत असून मी जणसेवा करताना, अशा लोकांना भिक्षा सोडून, काही काम करण्यासाठीही प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो, असेही सोनावने यांनी सांगितले.

(व्हिडीओ सौजन्य- Yeh Hai Zindagi)