राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी ३०, ३१ मे रोजी संपावर


मुंबई : ३० मे रोजी राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी संप पुकारला असून बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा भारतीय बँक संघाने कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला, याविरोधात संप पुकारला आहे. ५ मे २०१८ रोजी पगार वाढीसाठी बैठक झाली. बँक संघाने बैठकीत २ टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला. तसेच अधिकाऱ्यांच्या मागणीवरून केवळ स्केल ३ च्या अधिकाऱ्यांपर्यंत ही वाढ मर्यादीत असेल.

याबाबत माहिती देताना युनायटेड फोरम आणि बँक युनियन्सचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटले आहे की, बँकांचे जे नुकसान एनपीएमुळे झाले आहे, त्यात कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही. मागील २ ते ३ वर्षापासून बँक कर्मचाऱ्यांना जनधन योजना, नोटबंदी, मुद्रा आणि अटल पेन्शन योजना या केंद्राच्या प्रमुख योजनांमुळे रात्रंदिवस काम करावे लागले. या योजनांच्या कामाचा बोझा निश्चितच बँक कर्मचाऱ्यांवर पडला आहे, असे तुळजापूरकर यांनी म्हटले आहे.

मागील पगार वाढीत बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के वाढ करण्यात आली होती. १ नोव्हेंबर २०१२ ते ३१ ऑक्टोबर २०१७ साठी ही पगार समिक्षा होती. यूएफबी ९ श्रमिक संघटनेची कार्यकारिणी आहे. यात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लाईज असोसिएशन, तसेच नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स सामिल आहे.

Leave a Comment