कर्नाटकात पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल दोन रुपयांनी स्वस्त


बेळगाव – दिवसेंदिवस इंधनदरवाढीचा भडका वाढत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अशी परिस्थिती राज्यात सर्वत्र असताना महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या कर्नाटकात मात्र पेट्रोल आठ रुपये, तर डिझेल दोन रुपये १५ पशांनी स्वस्त असल्यामुळे कर्नाटक राज्यातच सीमेवरील वाहनधारकांसह वाहतूक व्यावसायिक टाक्या फुल्ल करीत आहेत.

कर्नाटक सीमेलगत उमरगा तालुका असल्याने कर्नाटक राज्यातील पेट्रोल पंप १५ किलोमीटर अंतरावर आहेत. पेट्रोलचा दर तेथे ७७ रुपये ९० पैसे आहे, तर एका लिटरसाठी उमरगा तालुक्यात ८५ रुपये ४० पसे मोजावे लागतात. कर्नाटकात कामानिमित्त गेलेले दुचाकी चालक आठ रुपयाने प्रतिलिटर दर कमी असल्याने पेट्रोल भरून येतात.

Leave a Comment