ही आहेत सहारा वाळवंटाशी निगडीत काही तथ्ये


आफ्रिकेमध्ये असणारे सहारा मरूस्थल किंवा वाळवंट अनेक रहस्यांनी भरलेले आहे. ह्या रहस्यांच्या मागे नेमकी कारणे काय ह्याचा शोध आजतागायत लागू शकलेला नाही. सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट असून, ह्या वाळवंटामध्ये एक विशालकाय ‘ निळा डोळा ‘ आहे. ह्या वाळवंटातील हे ठिकाण एखाद्या डोळ्याप्रमाणे दिसते. अवकाशातून हा निळा डोळा स्पष्टपणे दिसतो. सहारा वाळवंटाच्या मधोमध असलेले हे ‘रिचट स्ट्रक्चर’ रहस्यमयी आहे. हे स्ट्रक्चर ह्या ठिकाणी नेमके कसे उत्पन्न झाले, हे अद्यापही समजू शकलेले नाही. काही कयासांच्या नुसार एलियन्स पृथ्वीवर आल्याचा हा पुरावा असू शकतो. पन्नास किलोमीटरचा विस्तार असलेले हे स्ट्रक्चर १२० मीटर लांब आणि ३०० मीटर रुंद आहे. हे स्ट्रक्चर पृथ्वीवर दिसून येणारे एकमेव स्ट्रक्चर नसून अशी लहान मोठी अनेक स्ट्रक्चर्स पृथ्वीवर इतरत्र ही आहेत.

अतिशय रहस्यमयी प्रकारे सहारा वाळवंटाचा विस्तार कधी कमी तर कधी जास्त दिसून येतो. वैज्ञानिकांच्या मते वाळवंटाच्या बदलत्या आकारमानामागे ग्लोबल वॉर्मिंग हे कारण असून, गेल्या शंभर वर्षांमध्ये ह्या वाळवंटाचे क्षेत्रफळ नऊ लाख वर्ग किलोमीटर पर्यंत वाढले असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. सहारा वाळवंटामध्ये केवळ बारीक, सफेद वाळू दिसत असेल, ही समजूत चुकीची आहे. जगामध्ये सर्वात उष्ण असलेल्या ठीकाणांपैकी एक असलेल्या सहारामध्ये बर्फवृष्टी देखील होते. सहाराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या अल्जिरीयातील ऐन साफेरा मध्ये लाल वाळूवर जेव्हा पांढऱ्या शुभ्र हिमाचे आच्छादन पसरते, तेव्हा ते दृश्य फारच नयनरम्य दिसते. इथे सोळा इंचांपर्यंत बर्फवृष्टी होते. ऐन साफेरा हे जगातील सर्वात उष्ण वाळवंट मानले गेले आहे.

सहारा वाळवंट आफ्रिका महाद्वीपाचा भाग असून, आठ देशांमध्ये ह्याचा विस्तार आहे. ८४ लाख किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये ह्या वाळवंटाचा विस्तार आहे. ह्या वाळवंटाचा विस्तार इतका प्रचंड आहे, की येथे येणारे अनेक प्रवासी रस्ता चुकल्याच्या अनेक घटना इथे घडल्या आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी बिना दिशा दर्शक यंत्राच्या किंवा नकाशाच्या येणे, धोकादायक ठरू शकते.

Leave a Comment