हे आहे जगातील सर्वात किंमती घर


व्हिला ले’ सीडर ही १८७ वर्षांपूर्वी निर्माण केली गेलेली भव्य वास्तू आता विक्रीकरिता उपलब्ध झाली असून, दक्षिण फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यालगत सेंट जीन कॅप फेरात ह्या ह्या ठिकाणी ही वास्तू उभी आहे. ‘ब्लूमबर्ग’ ने दिलेल्या वृत्तानुसार हे घर १८,००० चौरस फुट इतक्या जागेमध्ये असून, ह्या घराला चौदा शयन कक्ष आहेत. पस्तीस एकर विस्ताराच्या भूखंडावर हे विशालकाय घर वसलेले आहे.

ह्या घराचे निर्माण १८३० साली करण्यात आले असून, याच्या सभोवताली ऑलिव्हज् ची पैदास होत असे. ‘विलेफ्राशे-सूर-मेर’ ह्या गावाच्या प्रतिनिधींचे हे घर होते. त्यानंतर प्रतिनिधींच्या परिवारजनांनी हे आलिशान घर बेल्जियमचे राजे दुसरे लिओपोल्ड ह्यांना १९०४ साली विकले. हे घर वसलेली भूखंडावर रबरची झाडे लावली गेली होती, तसेच ह्या भूखंडामध्ये अनेक धातूंच्या खाणी होत्या. रबर आणि धातूंच्या खाणींच्या मार्फत राजे लिओपोल्ड ह्यांनी प्रचंड संपत्ती कमविली.

राजे लिओपोल्ड ह्यांच्या मृत्युनंतर १९२४ मध्ये हे घर मार्निर लापोस्तोल ह्यांच्या मालकीचे झाले. येथे असे पर्यंत ह्यांनी ह्या घराच्या आसपास अनेक दुर्मिळ प्रजातींच्या झाडांनी भरलेली बाग फुलविली. हे घर ह्या परिवाराच्या ताब्यात अगदी अलीकडच्या काळापर्यंत, म्हणजेच २०१६ सालापर्यंत होते. त्यानंतर मार्निर ह्यांची कंपनी विकत घेणाऱ्या डेव्हिड कॅम्पारी मिलानो ह्यांच्या मालकीचे हे घर झाले.

आता ह्या घरची विक्री करायच्या उद्देशाने ह्या घरासाठी ३५० मिलियन पाऊंड इतकी किंमत ठरविली गेली आहे. ह्या घराची विक्रीचे व्यवहार मार्निर आणि डी फेड घराण्यातील पाच सदस्य पाहत आहेत. ह्या घराचा विस्तार प्रचंड असून अनेक देश-विदेशातील किंमती वस्तूंनी हे घर सजविलेले आहे.