४ रुपयांनी महागणार पेट्रोल-डिझेल


नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असून या किंमती पुढच्या काही दिवसात आणखी भडकू शकतात. याबाबत ब्रोकरेज कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेल कंपन्यांना कर्नाटक निवडणुकीच्या आधी पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एचपीसीएल, बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी-जास्त करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर आतापर्यंत प्रति लीटर पेट्रोल ६९ पैशांनी महागले असून आज यामध्ये झालेल्या २२ पैशांच्या वाढीचाही समावेश आहे. या आठवडयात डिझेलच्या किंमतीमध्ये ८६ पैसे वाढ झाली असून आज २२ पैशांची वाढ झाली.

Leave a Comment