‘क्लिन अप’ मोहीमेंतर्गत फेसबुकने डिलीट केली कोट्यवधी अकाउंट


वॉशिंग्टन – फेसबुक या प्रभावी सोशल मीडियाची साफसफाई करण्यात आली असून खुद्द फेसबुकने द्वेषवाचक, हिंसक, नग्न, आणि दहशतवाद अशा विषयांना बळ देणारे सुमारे ५८३ मिलीयन फेसबुक अकाऊंट डिलीट केली आहेत. फेसबुकने ही कारवाई या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात केली आहे. शिवाय, ८३७ मिलीयन ‘पिसेस ऑफ स्पॅम’ही कढून टाकण्यात आले आहेत. खुद्द मार्क झुकेरबर्ग याने फेसबुक अकाऊंटवर पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली आहे.

फेसबुक वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवणे, यालाच माझे प्रथम प्राधान्य असून एका शिस्तबद्ध नियंत्रित नियमात सहभाग घेणाऱ्या समुदायासाठी नवीन मार्ग विकसित करणे आणि तितकेच जबाबदार राहणे, यास पसंती असल्याची पोस्ट मार्क झुकेरबर्ग याने फेसबुकवर टाकली आहे. आणखी खूप काम आम्हाला करायचे असल्याचेही त्याने म्हटले.

बनावट फेसबुक अकाऊंटशिवाय, अनेक पोस्टही डिलीट करण्यात आल्या आहेत. त्यात सेक्स आणि नग्नतेसंदर्भात सुमारे २१ मिलीयन पोस्ट होत्या. २.५ मिलीयन पोस्ट वादग्रस्त होत्या. तर २ मिलीयन पोस्ट अल-कायदा आणि इसिससंदर्भात होत्या. या सर्व पोस्ट या वर्षातील सुरुवातीच्या तीन महिन्यातील होत्या. त्या सर्व हटविण्यात आल्या आहेत.

Leave a Comment