जाणून घेऊ या दुबई बद्दल काही रोचक तथ्ये


आजकाल परदेशी प्रवास करायच्या ठिकाणच्या यादीमध्ये दुबईला लोकांची विशेष पसंती मिळत आहे. जगातील सर्वात वैभवशाली शहरांबद्दल बोलायचे त्थाराविले तर दुअबीचा उल्लेख हटकून होतोच. तेलाचा खजिना लाभलेल्या ह्या ठीकाणाने मानव कल्पना करू शकेल अश्या सर्व वस्तू ह्या शहरामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे परदेशी भटकंती करता जायचे म्हटले, की दुबईला जाण्याच्या पर्यायाचा विचार आवर्जून होतोच. आजच्या काळामध्ये दुबई मध्ये केवळ जागील सर्वाधिक उंच इमारती नाही, तर आणखीही पुष्कळ काही आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या.

दुबईमध्ये जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’ असून, ह्या इमारतीमध्ये १६०व्या मजल्यापर्यंत निवासस्थाने आहेत. पर्यटकांना ह्या इमारतीच्या केवळ १२४व्या मजल्यापर्यंत जाण्याची परवानगी आहे. १२४व्या मजल्यावरून पर्यटकांना चारी बाजूंचे सुंदर दृश्य पहायला मिळते. येथे असलेल्या हाय रेझोल्युशन टेलिस्कोपने पाहिल्यानंतर धरती सर्व बाजूंनी गोलाकार दिसू लागते. तसेच एकेक मजला दर सेकंदाला पार करणाऱ्या वेगवान लिफ्टमध्ये खाली येताना हवेचा दबाव कानांमध्ये जाणवतो.

हवामानाबद्दल बोलायचे झाले तर दुबईचे हवामान वर्षातील आठ महिने उष्ण असते. उर्वरित चार महिने आते हवामान चांगले असते. उन्हाळ्यामध्ये येथील तापमान ५२ अंशांच्या वर जाते. नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत येथे हवामान पर्यटनाच्या दृष्टीने चांगले असते. ह्याच काळामध्ये सर्वाधिक पर्यटक दुबईला भेट देतात. येथे पाउस जवळजवळ नाहीच. डिसेम्बर आणि जानेवारी महिन्यात येथे पावसाच्या हलक्या सरी येतात. दुबई मधील शॉपिंग मॉल अतिशय भव्य आहेत. जर हा मॉल पूर्ण फिरू पहायचा म्हटला, तर त्यासाठी अनेक दिवस लागतील. हीच तऱ्हा एमिरेट्स मॉलची देखील आहे. दुबई मॉलमध्ये भले मोठे अक्वेरीयम आणि झू असून, एमिरेट्स मॉलमध्ये स्नो वर्ल्डचा आनंद पर्याटक घेऊ शकतात.

दुबई मॉलमधील अक्वेरीयम मध्ये सुमारे ३३,००० निरनिराळ्या प्रजातींचे समुद्री जीव पाहायला मिळतील. हे अक्वेरीयम बनविण्यासाठी बारा बिलियन डॉलर्स खर्च केला गेले आहेत. बुर्ज खलिफाच्या जवळ असलेल्या मॉलमध्ये हे अक्वेरीयम आहे. हे पाहण्यासाठी शंभर दिरहम, म्हणजेच पंधराशे रुपयांचे तिकीट घ्यावे लागते. येथे आल्यावर समुद्रामध्ये खोलवर आल्याप्रमाणे आभास होतो. ह्यामध्ये बोगद्याप्रमाणे रस्ता तयार केला असून, त्याच्या सर्व बाजूंनी समुद्री जीव विहरताना दिसतात. येथे असणाऱ्या झूमध्ये निरनिराळे दुर्मिळ जीव पाहायला मिळतात. एमिरेट्स मॉलमध्ये बनलेल्या स्नो वर्ल्डमध्ये स्कीईंगचा आनंद घेता येतो.

पर्यटकांना आणि स्त्रीयांना विशेष आकर्षण आस्ते ते येथील गोल्ड मार्केटचे. दुबईचे सोने आणि सोन्याची आभूषणे जगप्रसिद्ध आहेत. येथील दुकानांमध्ये पाच किलो पर्यंत वजनाचे दागिने पाहायला मिळतात. दुबई आर्थिक दृष्ट्या संपन्न शहर असल्याने येथील नागरिक भरपूर सोने खरेदी करीत असतात. इतकी संपन्न बाजारपेठ असूनही येथे चोऱ्या, दरोडे पडण्याची भीती नाही. दुबईचे गोल्ड मार्केट येथिल डेरा नामक भागामध्ये आहे. दुबी हे जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे. ह्या बंदराला रशीद पोर्ट नावाने ओळखले जाते. येथे असणारा जुमेरा बीच जगातील सर्वात शांत समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच हॉटेल दुबई मध्ये आहे. बुर्ज अल अरब हे हॉटेल साठ माजली असून, हे १०३१ फुट उंचीचे आहे. हे हॉटेल एका द्वीपावर बनलेले असून, ह्याच्या इमारतीचा आकार एखाद्या विशालकाय बोटीच्या शिडाप्रमाणे दिसतो. हेलिकॉप्टरने हॉटेल मध्ये जायचे असल्यास त्यासाठी ह्या हॉटेलमध्ये हेलिपॅडची व्यवस्था देखील केली गेली आहे.

दुबई हे आर्थिक दृष्ट्या अतिशय संपन्न शहर आहे. जगातील महागतील महाग गाड्या येथील रस्त्यांवर धावताना दिसतात. आर्थिक संपन्नतेचे मुख्य कारण हे की दुबईमध्ये कोणत्याही प्रकारचे कर लागू नाहीत. येथील वाहतुकीचे नियम अतिशय कडक असून रिकाम्या रस्त्यावरून जात असताना देखील सिग्नल मोडण्याची हिम्मत येथे कोणी करीत नाही. ह्यासाठी रस्त्यांवर सर्वत्र हाय रेझोल्युशन स्कॅनिंग कॅमेरा लावण्यात आले आहेत.

Leave a Comment