सफरचंद खा पण बियांपासून सावध रहा


सफरचंदाचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते हे आपल्याला माहिती हे. रोज एक सफरचंद खाल्ले तर डॉक्टरची गरज पडणार नाही असेही म्हटले जाते. मात्र सफरचंद जितके प्रकृतीसाठी चांगले आहे तितक्याच त्याच्या बिया मात्र माणसाच्या शरीरासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे सफरचंद खाताना चुकुन बियाही खाल्ल्या जात नाहीत ना याची काळजी जरूर घ्यावी.


सफरचंदाच्या बी मध्ये अमिल्ग्दिन नावाचे एक द्रव्य असते. बी पोटात गेली कि त्यातील या द्रव्याचा संयोग पोटातील एन्झाइम बरोबर होऊन त्यातून सायनाईड या भयंकर विषाची निर्मिती होते. यामुळे माणूस आजारी पडतोच पण हि मात्रा अधिक प्रमाणात असेल तर मृत्यू ओढवतो. भारतात सायनाईड च्या विक्री आणि खरेदीवर बंदी आहे. मानवी शरीरात ०.५ ते ०.८ मिली सायनाईड गेले तर मृत्यू होऊ शकतो. सफरचंदाच्या १ ग्राम वजनाच्या बी मध्ये ०.०६ ते ०.२४ मिली द्रव्य असते. त्यामुळे एकावेळी अनेक बिया खाल्ल्या गेल्या आणि त्यातही त्या फुटलेल्या असल्या तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

सफरचंदाची एखादी अखंड बी पोटात गेली तर नुकसान होत नाही. सफरचंदाची बी पोटात गेल्यावर मळमळ, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर सायनाईडची बाधा झाली नाहीना याची त्वरित खात्री करून घ्यावी. अश्या विषबाधेच्या लक्षणात मेंदू योग्य काम न काराने, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे अशी लक्षणे दिसतात. कमी प्रमाणात विष पोटात तयार झाले असेल तर मायग्रेन चा त्रास होतो, पोट दुखते आणि उलटी होऊ शकते.

Leave a Comment