आता जॉगिंग कशी करायचे हे शिकविणार ह्यूमनॉइड रोबोट्स


जपान देशातील सॉफ्टबँक ग्रुपच्या मालकीची असलेली टेक कंपनी बोस्टन डायनॅमिक्स द्वारे एक नवा ह्यूमनॉइड रोबोट तयार केला गेला असून, हा रोबोट जॉगिंग करण्यास सक्षम आहे. इतकेच नव्हे, तर हा रोबोट जिने चढत असतानाच्या, आणि चक्क कोलांट्या उद्या मारत असतानाच्या व्हीडोयो क्लिप्स व्हायरल होत आहेत. ह्या क्लिप्स पाहणारे सर्वच जण स्तिमित झाले आहेत. ह्या पूर्वी घरामध्ये किंवा हॉटेल्समध्ये सफाई करणारे, किंवा हॉटेल्समध्ये जेवण सर्व्ह करणारे रोबोट अनेक ठिकाणी पाहायला मिळाले होते, पण आता हा जॉगिंग करणारा, जिने चढणारा आणि लीलया कोलांट्या उड्या मारणारा रोबोट पाहून लोकांच्या आश्चर्याला पारावार उरलेला नाही.

हा व्हिडियो इंटरनेट सेन्सेशन ठरला असून, ह्या चौतीस सेकंदांच्या व्हिडियो क्लिपमध्ये बोस्टन डायनॅमिक्सने तयार केलेला हा ‘अॅटलास’ नामक रोबोट जिने चढ उतार करताना, कोलांट्या उद्या मारताना आणि दरवाजे उघड-बंद करताना दिसत आहे. तसेच वसंत ऋतूतील एका सुंदर सकाळी हिरवळीवर जॉगिंग करतानाही अॅटलास दिसत आहे. हालचाल करताना एखाद्या इलेक्ट्रॉनिक नाईफ किंवा झेरोक्स मशीनप्रमाणे अॅटलास मध्ये असणाऱ्या सर्व मशिनरीचा आवाज भासतो. जॉगिंग करीत असताना वाटेमध्ये पडलेला एक मोठा लाकडाचा ओंडका लीलया पार करून आपले जॉगिंग सुरु ठेवताना अॅटलास ह्या व्हिडियो क्लिप मध्ये दिसत आहे.

हा व्हिडियो प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच ह्याला तब्बल ९००,००० व्ह्यू मिळाले आहेत. त्याचसोबत ‘ ग्रेट जॉब, अॅटलास ‘ असे म्हणत बोस्टन डायनॅमिक्सच्या ह्या नव्या निर्मितीची अनेकांनी तोंडभरून वाखाणणी केली आहे. तर काही लोकांना रोबोट काय करू शकतात हे पाहून मानवजातीचा अंत जवळ असल्याची नव्याने खात्री पटली असल्याचे सांगणाऱ्याही काही कॉमेंट्स ह्या व्हीडीयोवर केल्या गेल्या आहेत.

सुप्रसिद्ध कंपनी ‘टेस्ला’ चे सह-संस्थापक एलोन मस्क ह्यांनी रोबोटच्या रुपात विकसित केल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण साशंक असून, ह्याचा इतक्या झपाट्याने होणारा विकास मानवासाठी हानिकारक ठरू शकेल असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या ह्या मतावर बोस्टन डायनॅम्मिक्सने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र अॅटलासला अजून जास्त सक्षम कसे बनविता येईल, त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहणार असल्याचे म्हटले आहे. ‘अॅटलास’ ची कंट्रोल सिस्टम, त्याच्या हातापायांच्या, इतर शरीराच्या हालचाली नियंत्रित करून संपूर्ण बॉडी मुव्हमेंट साध्य करते. ह्या ह्युमनॉइड मुळे माणसाचे काम आता आणखीनच सोपे होईल असे कंपनीचे मत आहे.

पळणे, दरवाजे उघडणे-बंद करणे, ह्याशिवाय अॅटलासला स्टीरियो व्हिजन आणि रेंज सेन्सिंगही दिले गेलेलं आहे. त्यामुळे आपल्या समोर येणार अडथळे पार करून आपले काम सुरु ठेवण्यासाठी अॅटलास सक्षम आहे. धावत असताना किंवा कोलांट्या उड्या मारत असताना देखील अॅटलास आपला बॅलन्स व्यवस्थित मेंटेन करू शकत असून, जर तो खाली पडलाच, तर मदतीशिवाय उठून उभे राहून तो आपले काम सुरु ठेवण्यासही सक्षम आहे.

Leave a Comment