अदिदासने कचऱ्यापासून कमावले कोट्यावधी !


पादत्राणे तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अदिदास या ब्रँडने आपली आणखी एक नवीन ओळख निर्माण केली असून कंपनीने पर्यावरणाची वाढती समस्या लक्षात घेऊन एक अतिशय वेगळे आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. या नामवंत कंपनीने प्लास्टीकच्या कचऱ्याचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी थेट प्लास्टीकचा वापर करत बूट तयार केले आहेत. कंपनीने २०१७ या वर्षात १० लाख बुटांचे जोड तयार केले. कंपनीने यामधून करोडो रुपयांचे उत्पादनही मिळवले आहे.

पश्चिम आफ्रिकेमधील पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्यांशी कंपनीने यासाठी संपर्क केला आणि जवळपास ९५ टक्के समुद्रातील प्लास्टीक जमा करत त्यापासून हे बूट बनवले. त्यानंतर २०१६ मध्ये अदिदासने समुद्रात मिळालेल्या याच प्लास्टीकपासून ७ हजार बुटांचे जोड तयार केले. यातील १० लाख जोड आतापर्यंत विकले गेल्याचे कंपनीने सांगितले आहे. याबाबत माहिती देताना कंपनीचे अधिकारी म्हणाले, प्लास्टीकच्या ११ बाटल्यांचा बुटाचा एक जोड तयार करण्यासाठी पुर्नवापर केला जातो.

Leave a Comment