
आजकाल व्हॉट्सअॅपशिवाय जगणे अनेकांसाठी अगदी अशक्य झाले आहे. सोशल मीडियामध्ये अफवादेखील झपाट्याने पसरतात. अशातच एका मेसेजमुळे आता व्हॉटसअॅप क्रॅश होऊ शकते अशा आशयाचे काही मेसेज फिरत आहेत. व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार, अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही फोनना त्याचा धोका आहे.
व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या ‘या’ मेसेजमुळे तुमचा स्मार्टफोन होऊ शकतो क्रॅश
काही मेसेज अॅन्ड्रॉईड आणि आयओएसच्या युजर्सना येत असल्यामुळे काही स्पेशल कॅरेक्टर्स छुप्या स्वरूपात आहेत. यामुळे टेक्स्टची प्रक्रिया बदलते. या अदृश्य स्वरूपातील सिम्बॉलमुळे व्हॉट्सअॅप फ्रीज होत आहे. एक असाही मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे ज्यामुळे काही सेकंदासाठी व्हॉट्सअॅप हॅंग होत आहे. त्यामध्ये असे लिहण्यात आले आहे की जर ब्लॅक पॉईंटवर क्लिक केले तर तुमचे व्हॉट्सअॅप हॅंग होईल. त्या ब्लॅक आयकॉनवर क्लिक केल्यानंतर अॅप फ्रीज होते.
व्हॉट्सअॅप क्रॅश होण्यामध्ये कोणताही व्हायरस नाही. पण तुम्हाला संबंधित कोणत्याही प्रकारचा मेसेज आल्यास त्यावर क्लिक करू नका. अनोळखी क्रमांकावरून कोणताही मेसेज आला तर तो उघडू नका. व्हॉट्सअॅपप्रमाणेच इतर मॅसेजिंग अॅपही अशाप्रकारच्या बगमुळे धोक्यात आली होती.
