जिओ आता पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत


रिलायन्स जिओ आता पुन्हा एकदा बाजारात धमाका करण्यासाठी सज्ज झाली असून आता फायबर टू द होम (FTTH) ही नवी ब्रॉडबॅंड सर्व्हीस लाँच करण्याच्या तयारीत रिलायन्स जिओ आहे. ग्राहकांना यामध्ये १०० जीबीचा हाय स्पीड डेटा मिळणार आहे. १०० जीबीची मर्यादा संपल्यानंतर युजरला एका महिन्यात २५ वेळा ४० जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

म्हणजेच ग्राहकांना एका महिन्यात तब्बल १,१०० जीबी डेटा मिळू शकेल. या ऑफरसाठी ४५०० रुपये सिक्युरीटी द्यावी लागणार आहे. त्यानंतर जिओकडून राऊटर इन्स्टॉल करुन दिले जाईल. याबरोबरच टीव्ही पाहण्यासाठी एक सेट टॉप बॉक्सही लावून दिला जाईल. त्यामुळे ग्राहकांना टीव्हीही सहज पाहता येणार आहे.

रिलायन्स जिओकडे सध्या देशभरात तीन लाख किलोमीटरहून जास्त ऑप्टीक फायबर नेटवर्क आहे. दिल्ली, मुंबई, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई आणि बडोदाबरोबरच भारताच्या इतर भागातही कंपनी आपल्या जिओ फायबर सर्व्हीसची ट्रायल घेत आहे. सामान्य ग्राहक आणि व्यावसायिक या दोन्ही ग्राहकांसाठी एकाचवेळी सेवा सुरु करण्याची योजना आहे.

Leave a Comment