दिवसा जास्त वेळ झोपणे ठरू शकते अपायकारक


आजवर आपण शरीराला भरपूर झोपेच्या रूपात मिळणाऱ्या विश्रांतीचे फायदे ऐकत आलो आहोत. किंबहुना दुपारच्या वेळी वीस ते पंचवीस मिनिटे घेतलेली ‘पावर नॅप’ किंवा वामकुक्षी मनुष्याची कार्यक्षमता वाढविण्यास सहायक आहे हे आता वैज्ञानिक रित्या सिद्ध झाले आहे. पण काही व्यक्तींना रात्रीच्या झोपेप्रमाणे दिवसा देखील भरपूर झोप घेण्याची सवय असते. ही सवय मात्र घातक असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

मनोवैज्ञानिकांच्या मते, दिवसा जास्त वेळ झोपल्याने मेंदू काल्पनिक आठवणींमध्ये गुंतून पडतो. लँकॅस्टर विद्यापीठामध्ये केल्या गेलेल्या रिसर्चमध्ये देखील हेच निदान करण्यात आले आहे. दिवसा एका तासापेक्षा जास्ती काळाची झोप आपल्याला आपल्या अनुभवांचा विसर पाडू शकते. झोपल्याने आपल्या ‘सब-कॉन्शस माइंड’ मध्ये आपल्या आठवणी पक्क्या रुजतात हे जरी खरे असले, तरी मेंदूच्या उजव्या भागामध्ये साठविलेल्या स्मृती जास्त झोपेमुळे नाहीशा होऊ लागतात.

आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपल्या मेंदूला दिवसभर मिळत असलेल्या सूचना मेंदुमधून ‘डीलीट’ केल्या जात असतात. अश्या प्रकारे आपला मेंदू त्याला मिळणार असलेल्या नव्या सूचनांसाठी स्वतःला तयार करीत असतो. पण ह्याच्या एकदम विपरीत परिणाम आपल्या मेंदूवर अति झोपेने होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. दिवसा जास्त वेळ झोपल्याने आपले मन निरनिराळ्या, न घडलेल्या घटनांची कल्पना करू लागते. ह्या घटना आपल्या बाबतीत घडल्या आहेत असे भास होऊ लागतात. त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य उद्भाविण्याचा धोका वाढतो. दिवसा झोपल्याने मेंदुचा उजवा भाग अधिक प्रभावित होत असतो. ह्याच भागामध्ये आपल्या आठवणी. स्मृती साठविलेल्या असतात. दिवसा जास्त झोपल्याने ह्या आठवणी पुसल्या जाण्याची शक्यता असल्याचे वैज्ञानिक म्हणतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment