आता व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची ‘वट’ वाढणार


अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे नवेनवे व्हर्जन्स सातत्याने अपडेट होत असतात. व्हॉट्सअॅप ग्रुप अडमिनला आतापर्यंत जास्त अधिकार होते. ग्रुपवर त्यांचे खूप नियंत्रण होते. लोकांना ते ग्रुपमध्ये अॅड करु शकत होते. रिमूव्ह करु शकत होते. पण अॅडमिनकडे ग्रुपचे नाव, आयकॉन बदलण्यावर नियंत्रण नव्हते. ते ग्रुपमध्ये कोणालाही सदस्य करु शकत असल्यामुळे काही अडचणींना सामोरे जावे लागत होते.

अॅडमिनच्या अधिकारात आता बदल होणार आहेत. हे बदल व्हॉट्सअॅपच्या 2.18.132 व्हर्जनमध्ये दिसून येतील. आता नवीन ग्रुप सेटिंग ऑप्शन्स अॅडमिनला ग्रुप इंफो पेजवर दिसतील. त्यावर टॅप केल्यास नवीन पेज ओपन होईल. त्यात editing the group’s info आणि change the group’s admins असा ऑप्शन दिसेल. त्यात all participants आणि only admin असे पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रुप अॅडमिन असाल आणि हे फिचर्स तुम्हाला टेस्ट करायचे असतील तर व्हॉट्सअॅपचे 2.18.132 हे व्हर्जन डाऊनलोड करा.

Leave a Comment