सेल्फी प्रेमींसाठी मस्त, कुलपॅडचा नोट ६


कुलपॅड सेल्फीप्रेमीना डोळ्यासमोर ठेऊन त्याचा नवा स्मार्टफोन नोट ६ नावाने लाँच केला आहे. या फोनला दोन फ्रंट कॅमेरे दिले गेले आहेत शिवाय ग्रुप सेल्फीसाठी १२० डिग्री वाईड अँगल लेन्स दिले गेले आहे. हा फोन ४ जीबी रॅम ३२ जीबी आणि ६४ जीबी अश्या दोन व्हेरीयंट मध्ये असून त्याची मेमरी मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधाही आहे.

या फोनला ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, अँड्राईड नगेट ७.० ओएस, ४०७० एमएएच बॅटरी, फिंगरप्रिंट सेन्सर, ३ एमपी चा रिअर तर ८ एमपीचा पहिला व ५ एमपीचा सेकण्ड फ्रंट कॅमेरा असे दोन कॅमेरे. डूअल सीम अशी फीचर्स आहेत. या फोनच्या किमती ३२ जीबी साठी ८९९९ तर ६४ जीबी साठी ९९९९ आहेत. हा फोन गोल्ड आणि ग्रे कलर मध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment