आता विमान प्रवासादरम्यान करता येणार मोबाईल कॉल


नवी दिल्ली – केंद्रीय नागरी विमान मंत्री सुरेश प्रभू यांनी दूरसंचार आयोगाने विमान प्रवासादरम्यान मोबाईल फोन कॉल आणि इंटरनेट वापरास सशर्त परवानगी दिली असल्याचे सांगितल्यामुळे आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान मोबाईल फ्लाईट मोडवर करण्यात काही प्रमाणात सुट मिळण्याची शक्यता आहे.

आता विमान प्रवाशांचा मोबाईल फोनहून कॉल करण्याचा आणि इंटरनेट वापराचा मार्ग दूरसंचार आयोगाच्या या निर्णयामुळे प्रशस्त होण्याची शक्यता आहे. दूरसंचार सचिव अरूणा सुंदरराजन यांनी पत्रकारांशी बोलताना दूरसंचाराशी संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी दूरसंचार लोकपालपद तयार करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे, असे सांगितले. ट्राय अंतर्गत प्रस्तावित लोकपाल येईल. तसेच यासाठी ट्राय कायद्यात संशोधन करावे लागेल. महत्वाचे म्हणजे दूरसंचार क्षेत्रात प्रत्येक तिमाहीला कमीत कमी एक कोटी तक्रारी येत असतात.

Leave a Comment