मुदतीनंतर रद्दी होणार पॅनकार्ड


मुंबई : सध्यासाठी एक महत्वाचा पुरावा म्हणून पॅनकार्डकडे पाहिले जाते. आयकर परतावा असो वा बँकेत खाते खोलणे असो पैशाच्या प्रत्येक देवाणघेवाणीसाठी पॅनकार्ड गरजेचे असते. त्याचबरोबर सरकारने शॉपिंगसाठीही पॅनकार्ड गरजेचे केले आहे. पॅनकार्ड हा एक असा दस्तावेज आहे जे तुमचे फायनान्शियल स्टेटस दाखवते. पण तुमचे हे पॅनकार्ड तुमच्यासाठी रद्दीही ठरु शकते. तुम्ही ३१ ऑगस्टपर्यंत जर पॅनकार्डसंबंधित महत्त्वाचे काम केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्दी होऊ शकते.

३१ ऑगस्ट पॅनकार्डला आधार लिंक करण्याची अंतिम तारीख असून तुम्ही जर आतापर्यंत पॅनकार्ड आधारला लिंक केले नसेल तर भविष्यात तुम्हाला समस्येचा सामना करावा लागू शकतो. ११.४४ लाख पॅनकार्ड सरकारने बंद केले आहेत अथवा त्यांना निष्क्रिय कॅटॅगरीमध्ये टाकले आहे. ३१ ऑगस्टची मुदत संपल्यानंतर आधार-पॅन लिंक होणार नाही.

गेल्या वर्षी सरकारने करदात्यांना आयकर परतावा करण्यासाठी आधारला पॅनशी जोडण्यास सांगितले होते. दरम्यान याची मुदत वाढवण्यात आली असून मार्च २०१८पर्यंत पॅन-आधारला जोडण्याची अंतिम तारीख होती. पण सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु असल्याने ही मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत आता ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे. ३० कोटी पॅनकार्डधारकांनी गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल २५ टक्के पॅन नंबर आधारशी जोडले आहेत. यातील ३ कोटी पॅनकार्ड गेल्या वर्षी आधारशी जोडण्यात आले होते.

Leave a Comment