आपल्या स्लीपिंग पॅटर्न वर आपले आयुष्यमान अवलंबून


आपल्या वयाचा किंवा आपले एकूण आयुष्मान किती असेल, ह्याचा थेट संबंध आपल्या झोपेशी किंवा स्लीपिंग पॅटर्नशी आहे असा खुलासा ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधामध्ये केला गेला आहे. ब्रिटन मध्ये वय वर्षे ३८ पासून ते ७३ वर्षांच्या वयोगटातील चार लाखांहूनही जास्त लोकांच्या स्लीपिंग पॅटर्न चे अवलोकन करून हे निदान करण्यात आले आहे. ज्या व्यक्ती रात्री उशीरापर्यंत जागरण करून सकाळी उशीरा उठतात, त्या व्यक्तींचे आयुष्यमान, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यमानापेक्षा कमी असल्याचे ह्या शोधाद्वारे सिद्ध झाले आहे. म्हणजेच उशीरा झोपून उशीरा उठणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यमान कमी असते असे हा शोध सांगतो.

इंग्लंडमधील सरी विद्यापीठातील शोधकर्ता माल्कम वॅन शेंत्झ ह्यांनी आपला स्लीपिंग पॅटर्न आपल्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ह्याकडे दुर्लक्ष करणे अपायकारक ठरू शकते. रात्री उशीरापर्यंत जागरण करणाऱ्यांना शरीरिक समस्याही अधिक प्रमाणात भेडसावत असल्याचे माल्कम आणि त्यांचे सह-शोधकर्ता क्रिस्टन कुनटसन ह्यांचे म्हणणे आहे.

माल्कम आणि क्रिस्टन यांनी अवलोकन केलेल्या व्यक्तींपैकी २७ टक्के व्यक्ती आपली बहुतांशी कामे सकाळच्या वेळामध्ये करणाऱ्या होत्या, ३५ व्यक्ती सकाळी जास्त काम करणाऱ्या, पण संध्याकाळीही थोडीफार कामे करणाऱ्या होत्या, २८ टक्के व्यक्ती सकाळी कमी आणि संध्याकाळी जास्त कामे करणाऱ्या होत्या, तर ९ टक्के व्यक्ती सर्व कामे रात्रीच्या वेळीच करणाऱ्या होत्या. ह्या व्यक्तींचे अवलोकन करताना त्यांचे वजन, एकंदर आरोग्य, धुम्रपान किंवा मद्यपानाच्या सवयी, सामजिक आणि आर्थिक परिस्थिती ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला होता.

गेली अनेक वर्षे सुरु असलेल्या ह्या संशोधनामध्ये ४ लाख पेक्षाही अधिक व्यक्तींचे अवलोकन करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत जागणाऱ्या व्यक्तींमध्ये मधुमेह, पोटाचे किंवा श्वसनाचे विकार, मनोविकार, निद्रानाश अश्या प्रकारचे विकार अधिक प्रमाणामध्ये आढळून आले. ह्या व्यक्तींमध्ये धुम्रपान, मद्यपान, चहा कॉफीचे सेवन अधिक असल्याने त्यांचे मूळचे विकार आणखीनच बळावत असल्याचे दिसून आले. तसेच रात्री उशीरा झोपून सकाळी उशीरा उठण्याची सवय असल्याने ह्या व्यक्तींचे ‘बायोलॉजिकल क्लॉक’ ही गडबडले असल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्री उशीरा पर्यंत जगण्याच्या सवयीमध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता असल्याचे शोधकर्त्यांचे मत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment