ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?


जर आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेली अजब गजब तथ्ये आपण विचारात घेतली, तर पृथ्वी हा ग्रह खरोखरच किती गुंतागुंतीचा, पण तरीही ‘वेल डिझाईन्ड’ आहे हे आपल्या लक्षात येईल. ह्या ग्रहाबद्दल आता विज्ञानाच्या मदतीने अनेक गोष्टी माहित झाल्या असल्या तरी अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या अजूनही आपल्याला फारशा माहिती नाहीत. अशीच काही तथ्ये ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

कॅलिफोर्निया मधील ‘डेथ व्हॅली’ हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण ठिकाण समजले जाते. तेथील तापमान ५७ डिग्री सेल्सियसच्या ही वर गेल्याची नोंद अस्तित्वात आहे. ह्या उलट अंटार्कटीका येथील सोव्हियेत व्होस्टोक स्टेशनवर जगातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. २१ जुलै १९८३ साली ह्या ठिकाणी पारा -८९ अंशाच्या हे खाली घसरला होता.

दर ४५०,००० वर्षांनी पृथ्वी आपले ‘मॅग्नेटीक पोल्स’ किंवा ‘ध्रुव’ बदलते. म्हणजेच जो भाग उत्तर ध्रुव म्हणून ओळखला जातो तो भाग ४५०,००० वर्षांनी दक्षिण गोलार्धात बदलेल. हा बदल घडायला आणखी दोन हजार वर्षे बाकी आहेत. एव्हरेस्ट शिखर हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर समजले जाते. पण जर पर्वताच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत उंची मोजायची म्हटली, तर हवाई येथील ‘मौना की’ हे शिखर सर्वात उंच ठरेल.

तब्बल ६६ तन वजनाचा मिटीयोराइट अवकशातून येऊन पृथ्वीवर पडला. हा मिटीयोराईट आफ्रिकेतील नामिबिया मध्ये असून हा तब्बल ऐंशी हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर आला असल्याचे म्हटले जाते. आश्चर्याची गोष्ट अशी, की हा मिटीयोराईट अवकाशातून पृथ्वीवर येऊन आदळल्यानंतर देखील त्याचे तुकडे न होता, तो एकसंधच राहिला. पृथ्वीवरील महासागर आपल्या अथांग खोलीमध्ये अनेक रहस्ये दडवून आहेत. ‘मारियाना ट्रेन्च’ म्हणून ओळखल्या जाणारा, पॅसीफिक महासागरातील भाग पृथ्वीवर अस्तित्वात असलेला सर्वात खोल भाग म्हणून ओळखला जातो. ह्या ट्रेन्चची खोली सुमारे दहा किलोमीटर आहे.

अंटार्कटीका येथील मॅक मर्डो ड्राय व्हॅली हे ठिकाण जगातील सर्वात शुष्क किंवा कोरडे ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण जरी अंटार्कटीकाचा भाग असले, तरी येथे बर्फ दिसत नाही. या भागामध्ये २ मिलियन वर्षांपेक्षा अधिक काळ पाऊस पडलेला नाही. तसेच ह्या जगातील सर्वात पुरातन अवशेष हे मनुष्याचे किंवा प्राण्यांचे नसून बॅक्टेरीयांचे आहेत. हे अवशेष साडे तीन बिलियन वर्षे जुने आहेत.

Leave a Comment