स्वित्झर्लंड देशातील काही विशेष तथ्ये


स्वित्झर्लंडचा नुसता ओझरता उल्लेख जरी झाला, तरी हिरवीगार कुरणे, बर्फाच्छादित पर्वतराजीची शिखरे हे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहते. स्वित्झर्लंडच्या सफरीची केवळ कल्पना प्रत्येक पर्यटकाच्या मनाला भुरळ घालणारी असते. ह्या देशाशी निगडीत काही विशेष तथ्ये आहेत, जी फारशी सर्वश्रुत नाहीत. स्वित्झर्लंड देशामध्ये गाय भाडेकरारावर घेता येऊ शकते. इतकेच नाही, तर करारानुसार गाय जितके दिवस तुमच्याकडे असेल, तितके दिवस त्या गायीचे दुध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेला प्रत्येक पदार्थ संपूर्णपणे तुमच्या मालकीचा असेल. त्यातील कोणत्याही हिस्सा गायीच्या मूळ मालकाला देण्याची आवश्यकता नाही.

सभोवताली अतिशय भव्य, सुंदर पर्वतीराजी असणाऱ्या या देशाला पृथ्वीवरील स्वर्गाची उपमा देण्यात येते. तसेच हा देश जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय हनिमून डेस्टीनेशन आहे. जगप्रसिद्ध कॉमेडीयन चार्ली चॅप्लीन यांनी आपल्या आयुष्याची अखेरची पंचवीस वर्षे स्वित्झर्लंडमधील लेक जेनेव्हा येथे व्यतीत केली. स्वित्झर्लंड हा देश बँकांसाठी प्रसिद्ध आहे. येथील तमाम बँकांमध्ये जगभरातील धनाढ्य व्यक्तींची संपत्ती सुरक्षित आहे. तसेच जगभरातील अनके देशांच्या सरकारी संपत्तीची खाती देखील येथील बँकांमध्ये आहेत.

जगातील सर्वात शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या ह्या देशाला खरेतर स्वतःच्या रक्षणासाठी सैन्याची आवश्यकता फारशी पडत नाही. येथील सैन्यातील जवानांकडे ‘स्विस नाईफ’ शस्त्र म्हणून हमखास दिसून येतो. ह्या स्विस नाईफचा रंग लाल असून, बर्फामध्ये चाकू पडला तरी तो सहजी दिसून यावा, या करिता त्याचा रंग लाल असतो. जगामध्ये सॉफ्ट ड्रिंक्सचा सर्वात जास्त खप कुठे होत असेल, तर तो म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये. खरे तर स्वित्झर्लंड हा देश अतिशय कमी जनसंख्या असणारा आहे. पण तरीही जगामध्ये सर्वात जास्त शीतपेयांचा खप ह्या देशामध्ये आहे.