शाळेत योगाच्या वर्गांमुळे विद्यार्थ्यांना ताण व चिंतेशी लढण्यास मदत


शाळेत योग आणि जागरूकतेच्या कार्यात भाग घेतल्याने लहान मुलांमध्ये तणाव आणि चिंता दूर होते, तसेच त्यांचे भावनिक आरोग्य सुधारते, असे एका ताज्या संशोधनात आढळले आहे.

अमेरिकेतील ट्यूलने विद्यापीठातील संशोधकांनी एका शाळेच्या सहकार्याने हे संशोधन केले. या संशोधकांनी या शाळेत योगाचा अभ्यासक्र सुरू केला. पूरक पाठिंब्याची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहानुभूती-आधारित कार्यक्रमात या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला. या अंतर्गत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिंतेचे लक्षण दाखविणाऱ्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांचे दोन गटांमध्ये विभागण्यात आले. यातील 32 विद्यार्थ्यांना नेहमीचेच मानसिक साहाय्य पुरवण्यात आले, तर 20 विद्यार्थ्यांनी योग अभ्यासक्रमाच्या आठ आठवड्यांच्या कार्यक्रमात भाग घेतला.

सायकॉलॉजी रिसर्च अँड बिहेव्हियर मॅनेजमेंट या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ” अनेक मुलं तिसऱ्या इयत्तेत जाताना अधिक चिंताग्रस्त होतात कारण वर्गातील काम अधिक जटिल बनते, असे आमच्या सुरुवातीच्या कामात आढळून आले. योगाचे धडे दिलेल्या विद्यार्थ्यांची मानसिक व भावनिक पातळी सुधारली. आम्हाला शिक्षकांनीही वर्गामध्ये योगासने घेण्याच्या फायद्यांबद्दल सांगितले. ते प्रत्येक आठवड्यामध्ये योगाचा वापर करत आहेत,” असे ट्यूलने विद्यापीठाच्या प्राध्यापिका अलेसांद्रा बाझेनो म्हणाल्या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment