चंदा कोचर यांना व्हिडिओकॉन प्रकरण भोवणार ?


नवी दिल्ली – ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना व्हिडिओकॉन कर्ज मंजूर प्रकरण भोवण्याची शक्यता असून कोचर यांच्यावर दोन आठवड्यापूर्वी विश्वास दाखविणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापन मंडळाने यू-टर्न घेतला असल्यामुळे कोचर पदावर कायम राहणार, की नाही यावरून बँकिंग वर्तृळात चर्चेला उधाण आले आहे.

३१ मार्च २०१९ ला कोचर यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार संपणार असून एनआरपीएल कंपनीची व्हिडिओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत आणि चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी सहभागीदारीतून स्थापना केली. धूत यांनी एक महिन्यानंतर कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि आपले शेअर्स दीपक कोचर यांच्या नावे केले. तसेच धूत यांच्या मालकीच्या सुप्रीम एनर्जी कंपनीने एनआरपीएलला ६४ कोटी रूपयांचे कर्ज दिले. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेने धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार २५० रुपयांचे कर्ज मंजूर केले. हे कर्ज प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चंदा कोचर यांच्यावर स्वार्थासाठी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे.

Leave a Comment