एके ४७ विसरा, भारतात बनणार एके १०३


सर्व जगभरात प्रसिद्ध असलेल्या कालाश्कीनोव्ह रायफल्स म्हणजेच एके ४७ रायफल्स संरक्षणासाठी उत्तम दर्जाच्या मानल्या जातात. भारतातही या रायफल्स मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. मात्र या रायफल्सपेक्षाही अधिक उत्तम दर्जाच्या एके १०३ रायफल्स भारतात मेक इन इंडिया योजनेखाली बनविल्या जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सर्व बाबी योजनेनुसार पार पडल्या तर हे उत्पादन भारत सुरु होणार असून त्यासाटी रशियाबरोबर चर्चेच्या काही फेरया पार पडल्या आहेत.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण याच्याबरोबर या संदर्भात चर्चा झाली असून रशियाने गतवर्षीच या रायफलचे उत्पादन भारत करण्याचा प्रस्ताव दिला होता असे जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितले. एके रायफल्स त्यावेळी भारतीय लष्करच्या मानकानुसार नव्हत्या मात्र लष्कराने असोल्ट रायफलसाठी नवीन स्पेसीफिकेशन बनविल्यानंतर आता त्या भारतीय सेनेसाठी योग्य ठरतील असे समजते. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या सहकार्याने या रायफल्स बनविल्या जाणार आहेत. भारतीय लष्कराची गरज पूर्ण केल्यानंतर त्या निर्यात करण्यात येणार आहेत असेही समजते.

एके ४७ हे या रायफलचे बेसिक व्हर्जन आहे तर एके १०३ हे अत्याधुनिक व्हर्जन आहे. याचा आकार आणि वजन सुटसुटीत असल्याने दहशतवादी विरोधी कारवाईत त्या महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या रायफल मधून ५०० मीटरवर निष्ण साधता येतो. रिकाम्या रायफलचे वजन साडेतीन किलो आहे. एके ४७ हि आत्तापर्यंतची सर्वाधिक कॉपी केलेली रायफल असून कोणत्याही वातावरणात ती वापरता येते आणि १ मिनिटात साफ करता येते.

Leave a Comment