तेरा आकडी मोबाईल नंबरचे टेस्टिंग सुरु


दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना १३ आकडी मोबाईल नंबर जारी केले असून त्यांचे टेस्टिंग सुरु झाले असल्याचे समजते. सध्या या चाचण्या मशीन टू मशीन कम्युनिकेशन साठी सुरु आहेत. हे कम्युनिकेशन म्हणजे स्मार्ट वीजमीटर व कार ट्रेकिंग डिव्हायसेस सारख्या उपकरणात होऊ शकणारा एक प्रकारचा संवाद असतो.

बीएसएनएल, भारती एअरटेल, रिलायंस जिओ, आयडिया सेल्युलर, व्होडाफोन या कंपन्यांना चाचण्यांसाठी हे नंबर जारी केले गेले आहेत. गेले काही दिवस मोबाईल नंबर तेरा आकडी होणार अश्या अफवा पसरत आहेत. युजर्सना दहा आकड्याऐवजी १३ आकडी नंबर दिले जाणार असल्याचेही सांगितले जात होते त्याचा उलगडा आता झाला आहे. मशीन टू मशीन सिमकार्ड ऑटोमेटेड मशीनमध्ये वापरले जाते. त्यासाठी नेटवर्क कनेक्टीव्हिटीवर चालणाऱ्या मशीनसाठी त्याचा जादा वापर होतो. या मशीनची रेंज छोट्या गॅजेट पासून मोठ्या मशीनपर्यंत असू शकते. मात्र त्यासाठी ही मशीन काम करताना इन्टरनेट अथवा मोबाईल नेटवर्क कनेक्टीव्हिटीची गरज असते.

Leave a Comment