तुमची लाडकी वॅगनार होणार ७ सीटर


मारुती सुझुकी आपल्या लोकप्रिय वॅगनार गाडीचे नवे मॉडल ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे. पण वॅगनारचे हे मॉडेल दिसण्यामध्ये थोडे हटके आहे. गाडीत आसनव्यवस्थादेखील ७ सीटर करण्यात आल्यामुळे ही गाडी यंदाच्या फेस्टीव्ह सिझनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या वॅगनारमध्ये केवळ ५ व्यक्ती बसू शकतात.

नव्या वॅगनार आरमध्ये १.२ लीटरच्या सिलेंडरयुक्त पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे तर ३ सिलेंडरवाले इंजिन ८४ बीएचपीच्या पावरसह ११५एनएम टॉर्क जनरेट होते. ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिल ट्रान्समिशन अशा दोन्ही स्वरूपात ही कार उपलब्ध आहे. नव्या वॅगनारमध्ये सीएनजीचे ऑप्शन देण्यात आले आहे.

तीन व्हेरिएंटमध्ये मारुती वॅगनार आर लॉन्च होण्याची शक्यता असून हे तीन व्हेरिएंट आर बेस, आर टॉप आणि आर सीएनजी या स्वरूपात उपलब्ध होऊ शकते. याशिवाय काही बाजारात वॅगनार सीएनजी आणि एलपीजी फ्यूल मोडचा पर्याय मिळणार आहे. कंपनी या कारला ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या टप्प्यात या कारची किंमत सुमारे ५.२ लाख एवढी असू शकते.

७ जणांसाठी आसनव्यवस्था वॅगनार आरमध्ये असेल. की-लेस एन्ट्रीसोबत सेंट्रल लॉकिंग, सिक्युरिटी अलार्म, ड्युएल टोन डॅशबॉर्ड, ब्लूटुथसोबत डबल डिन स्टिरिओ, प्रिमियम सीट फॅब्रिकसोबतच रिअर पॉवर विंडो असेल. नव्या स्वरूपातील वॅगनारमध्येही गाडीचा फ्रंट आणि बॅक भाग जुन्या गाडीप्रमाणेच असेल. लांबी थोडी जास्त असेल. नव्या वॅगनारमध्ये १४ इंचचे अलॉय व्हिल, रेग्युलर हॅलोजन हेडलॅम्प्स, रूफ रेल्ससाराखी फीचर्स असतील.

Leave a Comment