एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणार मुंबई-गोवा क्रूझ सेवा!


मुंबई: बहुप्रतिक्षीत मुंबई-गोवा क्रूझ सेवा येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीसाठी गोव्याला जाणाऱ्यांना प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई-गोवा क्रूझ सेवा महाराष्ट्र आणि गोवादरम्यान जलवाहतुकीला चालना देण्यासाठी सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीपासूनच सुरु होणार होती, मात्र ती अजूनही सुरु झाली नाही.

मुंबई-गोवा क्रूझ सेवा आता काही दिवसातच सुरु होणार आहे. विशेष म्हणजे म्हणजे या प्रवासासाठी एकावेळचे तिकीट एक ते दीड हजार एवढे असेल. मुंबई-गोवा मार्गावर क्रूझ सेवा सी ईगल ही कंपनी पुरवणार आहे. ही क्रूजसेवा एक दिवसआड असेल. या क्रूझमधून एकावेळी २०० ते २५० प्रवाशी प्रवास करु शकतात. अनेकजण मुंबईहून उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने गोव्याला जातात. त्यांच्यासाठी रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता त्यांना समुद्रातून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Leave a Comment