तुमच्या जेवणाच्या प्लेटचा रंग आणि वजनाचा थेट संबंध


आपल्या वजनाचा संबंध अनेक गोष्टींशी आहे. आपला आहार, आपण करीत असलेला व्यायाम, आपली जीवनशैली, अश्या अनेक गोष्टींशी असतो हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. मानसिक तणाव, अपुरी झोप, ह्या गोष्टींचा देखील आपल्या वजनावर परिणाम होत असतो. पण या गोष्टींच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे जेवण ज्या रंगाच्या प्लेट मधुन घेता, त्या रंगाचा देखील तुमच्या वजनावर परिणाम होत असतो हे तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल. पण अलीकडेच झालेल्या एका रीसर्च मध्ये तज्ञांनी हे निदान केले आहे.

ह्या रीसर्चनुसार तुम्ही ज्या रंगाच्या प्लेटमधून जेवता, त्या रंगाचा थेट संबंध तुमचे वजन नियंत्रित करण्याशी आहे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. म्हणूनच आपण ज्या प्लेटमध्ये जेवतो त्या प्लेटचा रंग विचारात घेणे आवश्यक आहे. आधी आपल्याकडे केवळ स्टीलच्या प्लेट्स प्रामुख्याने वापरल्या जात असत. पण आता मेलामाईन, काच, ब्लू पॉटरी, चायना ग्लास अश्या अनेक तऱ्हेच्या प्लेट्स आपल्याकडे सर्रास वापरल्या जाऊ लागल्या आहेत. ह्या प्लेट्स अनेक निरनिराळ्या आकर्षक रंगांमध्ये बनविल्या जातात. त्यामुळे प्लेट्स निवडताना त्यांचा केवळ रंग चांगला दिसतो म्हणून न निवडता, यांचा संबंध आपल्या वजनाशी आहे हे लक्षात घेऊन रंग निवडावा.

ह्या रीसर्चनुसार, हलक्या रंगांच्या प्लेटमध्ये जेवण घेताना आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न सेवन करतो, तर गडद रंगांच्या प्लेटमध्ये जेवण घेतल्याने जेवणाची मात्रा आपोआपच नियंत्रित राहत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. गडद रंगांच्या प्लेटमध्ये जेवल्याने भूक लवकर शमते असे वैज्ञानिक म्हणतात, आणि भूक लवकर शमल्याने आपोपापाच कमी जेवले जाते, म्हणून वजन आटोक्यात ठेवायलाही मदत होत असल्याचे निदान वैज्ञानिकांनी केले आहे. गडद रंग आपल्या मेंदूला शांत करणारे, संतुष्टीची भावना देणारे आहेत, म्हणूनच ह्या रंगांच्या प्लेटमधून जेवल्याने भूक लवकर शमल्याची भावना होते.

वैज्ञानिकांच्या मते, गडद रंगांमध्ये निळ्या रंगाच्या प्लेट्स सर्वोत्तम समजल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना आपल्या वजनावर नियंत्रण मिळवायचे असेल, त्यांनी मध्यम आकाराच्या निळ्या रंगाच्या प्लेटमध्ये जेवण घ्यावे असा सल्ला वैज्ञानिक देतात. तसेच ही प्लेट प्लास्टिक ची न असता सिरॅमिकची असावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment