‘धक धक गर्ल’ माधुरीच्या फिटनेसचे रहस्य; सिमला मिरची


बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने हिने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊन्टवर सिमला मिरचीचे छायाचित्र शेअर करीत, जैविक ( ऑरगॅनिक ) अन्नपदार्थांच्या विषयी आपली आवड व्यक्त केली. दिवसेंदिवस माधुरीचे वाढत जाणाऱ्या सौंदर्याचे श्रेय माधुरी आपल्या आहाराला देते. माधुरीने काही दिवसांपूर्वी आपल्या घराच्या बगीच्यातील सिमला मिरच्यांची छायाचित्रे आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊन्टवर शेअर केली होती. त्याचबरोबर तिने ह्या छायाचित्रांच्या सोबत ‘#organic #vegetables # gardening’ असे कॅप्शनही दिले होते.

सिमला मिरचीचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य केला जावा असे आहारतज्ञांचे मत आहे. लाल, पिवळ्या रंगाची सिमला मिरची अतिशय पौष्टिक असतेच, पण हिरवी सिमला मिरची देखील अतिशय पौष्टिक आहे. एका संत्र्यामध्ये असते तितके क जीवनसत्व हिरव्या सिमला मिरचीमध्ये आहे. क जीवनसत्व शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास सहायक आहे. जैविक पद्धतीने उगविलेल्या सिमला मिरचीमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असल्याचे आहारतज्ञांचे मत आहे. तसेच सिमला मिरचीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स देखील मोठ्या प्रमाणावर आहेत.

हिरव्या सिमला मिरचीमध्ये फायबरची मात्र भरपूर आहे. ह्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांमध्ये शरीराचे मेटाबोलिझम वाढून वजन संतुलित राखण्यास सिमला मिरचीचे सेवन सहायक आहे. ह्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय रोगाला देखील आळा बसतो. दृष्टीदोष दूर करण्यासाठी देखील सिमला मिरचीचे सेवन फायदेशीर आहे. ह्या सर्व गुणांसाठी सिमला मिरचीचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे अगत्याचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment