ट्विटरच्या मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्याने सोडले पद


सॅन फ्रॅन्सिस्को – सोशल नेटवर्किंग साईट्सच्या युजसर्चा डेटा सुरक्षित नसल्याचे प्रकार समोर येत असतानाच ट्विटरचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी मायकल कोएटेस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कोएटेस यांनी ट्विटरचा प्रवास खूपच विस्मयकारक होता. पण मी काही आठवड्यांपूर्वीच सांगितले, की माझी वेळ आता संपत आली आहे, असे ट्विट केले आहे. आता मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी म्हणून माहिती सुरक्षा व रिस्कचे वरिष्ठ व्यवस्थापक जोसेफ कॅमिलेरी काम बघतील.

ऑगस्टमध्ये फेसबुकचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी अॅलेक्स स्टामोस हे फेसबुक सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या फेसबुक अडचणीत सापडले असून केंब्रिज अॅनाटिकल या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीने फेसबुकच्या पाच कोटी युजर्सचा तपशील वापरल्याचा प्रकार समोर आला होता. गुगलचे माहिती सुरक्षा इंजिनिअरिंगचे संचालक मायकेल झालेवस्की यांनीही ११ वर्षांनंतर गुगल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment