
जगातील आत्तापर्यंतचे सर्वात महागडे चॉकलेट शुक्रवारी पोर्तुगीज चोकलेटीअर डॅनिअल गोमेज याने पोर्तुगालचा ओबेदास येथील चॉकलेट फेअर मध्ये सादर केले असून त्याची किंमत ७२२८ युरो म्हणजे सुमारे ९५०० अमेरिकी डॉलर म्हणजे साडेसहा लाख रुपये आहे. हिऱ्याच्या आकाराच्या या चॉकलेट मध्ये अत्यंत उच्च दर्जाचे केशर, मादागास्कर मधला व्हॅनिळा, पांढरे मश्रूम असे पदार्थ वापरले गेले असून त्यावर २३ कॅरेट सोन्याचा वर्ख लावला गेला आहे. हे चॉकलेट सोन्यासकट खाता येणार आहे. या चॉकलेट च्या रक्षणासाठी दोन गार्ड नेमले गेले आहेत.
चॉकलेटचा खायचं?- सहा लाख रुपये मोजा
अशी १ हजार चॉकलेट बनविली जात असून २०१७ मध्ये ला मेडेलिन चॉकलेट सर्वात महाग म्हणून गिनीज बुक मध्ये नोंदविले गेले होते. या चॉकलेटची किंमत होती २५० डॉलर. आता डायमंड आकाराचे हे चॉकलेट महागडेपाणाची सर्व रेकॉर्ड मॉडेल असा दावा केला जात आहे. या चॉकलेट साठी मुकुटाच्या आकाराची बॉक्स बनविली गेली असून त्यावर ५५०० अतिमहाग सोरोवास्की क्रिस्टल जडविले गेले आहेत. या चॉकलेट साठी अरब देश, रशिया, अंगोला, ब्राझील, आर्जेन्टिना येथून मागणी आल्याचे डॅनियल याचे म्हणणे आहे मात्र पोर्तुगाल मधून अजून एकही मागणी नाही याची त्याला खंत वाटते आहे.
