स्मशानात आहे हे श्यामामाई मंदिर


आदिशक्तीची विविध रूपे आहे त्यातील एक आहे कालीमाता. कालीमातेचा अवतार हाच मुळी दुष्टांचा विनाश करण्यासाठी झालेला आहे. याच कालीमातेचे एक स्वरूप श्यामामाईचे प्रसिद्ध मंदिर बिहारचा दरभंगा येथे आहे. विशेष म्हणजे हे मंदिर स्मशानात आहे आणि तरीही येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. हि माई भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असा विश्वास आहे. अर्थात येथील देवी सौम्य स्वरुपात म्हणजे भद्रकाली स्वरुपात असून ती प्रत्यक्ष सीतामाता असल्याचे सांगितले जाते.


याची कथा अशी सांगतात की रावणवधानंतर सीतेने जो कुणी सहस्त्राननाचा वध करेल तोच खरा वीर असेल असे म्हटल्याने स्वतः ram गेले तेव्हा तेच सहस्राननाच्या बाणाने जखमी झाली. यामुळे सीतेला अतिशय क्रोध आला त्यामुळे तिचा वर्ण काळा पडला. तिनेच शेवटी क्रोधात सहस्राननाचा वध केला. तिला शांत करण्यासाठी महादेव आले त्यानाही तिने पायाखाली घेतले. मातेचे हेच रूप मंदिरात विराजमान आहे.

हे मंदिर ललित नारायण मिथिला विश्वविद्यालयाच्या प्रांगणात आहे. येथे दरभंगा राजवंशातील परिवारावर अंत्यसंस्कार केले जात म्हणजे हे स्मशान आहे. श्यामामाई चे मंदिर महाराजा रामेश्वरसिंग याच्या चितेवर बांधले गेले असून अन्य मंदिरे कुणा ना कुणा राज्पारीवाराच्या चीतांवर आहेत. वास्तविक स्मशानात कोणतेच शुभकार्य केले जात नाही मात्र या ठिकाणी नवविवाहित जोडपी मातेचा आशीर्वाद घ्यायला आवर्जून येतात. येथे अनेक विवाहही साजरे होतात. येथे येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते याचा अनुभव अनेकांना येतो.

Leave a Comment