गुगल देणार पदवीधर युवकांना नोकरी


इंटरनेटवर जायंट सर्च इंजिन असलेले गुगल पदवीधर युवकांना नोकरी देणार असून गुगल टेक्निकल आणि सेल्स-मार्केटिंगमध्ये नोकरीची संधी देत आहे. गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकणारे विद्यार्थीही अर्ज करु शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना गुरुग्राममध्ये जाऊन नोकरी करावी लागेल. गुगल फ्रेश आयडिया, इंफॉरमेशन रिट्रायव्हल, डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग, लार्ज स्केल सिस्टिम डिझाईन, नेटवर्किंग अॅण्ड डेटा स्टोरेज असणाऱ्यांना नोकरी देणार आहे.

सेल्स अॅण्ड अकाऊंट मॅनेजमेंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए/ बीएएसची पदवी किंवा त्या योग्यतेची पदवी असावी लागणार आहे. त्याचबरोबर IaaS किंवा PaaS प्रॉडक्टमध्ये काम करण्याचा २ वर्षांचा अनुभव आणि इंग्लिश बोलणे आणि लिहिणे आले पाहिजे. तसेच टेक्निकल/ सेल्स इंजिनिअरिंगमध्ये आणि सीआरएम सिस्टिममध्ये अनुभव असणे आवश्यक आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग मार्केट आणि टेक्नोलॉजीचा समज, गुगल क्लाऊड प्रोडक्टची माहिती असणे गरजेचे आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कंप्युटर सायन्समध्ये बीए/बीएस पदवी किंवा त्या योग्यतेची पदवी असावी लागणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, Unix/Linux environments, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, नेटवर्किंग डेव्हलपिंग लार्ज सॉफ्टवेअर सिस्टिमचा अनुभव आणि इंग्लिश बोलणे आणि लिहिणे आले पाहिजे. तसेच मास्टर्स, पीएचडी, किंवा कोणत्याही टेक्निकल फील्डचा अनुभव आणि Java, C/C++, C#, Objective C, Python, JavaScript, or Go यातील एकाचा अनुभव असणे आवश्यक आहे. दुसरी को़डिंग भाषा शिकण्याची योग्यता असली पाहिजे. याबाबतची अधिक माहिती www.careers.google.com या वेबसाईटवर मिळू शकते. तसेच या वेबसाईटवरूनच तुम्ही नोकरीसाठी अर्जही करु शकता.

Leave a Comment