तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चिनी हॅकर्स करत आहेत घुसखोरी


व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भारतीय युजर्सना चायनीज हॅकर्स टार्गेट करत असून डाटा गोळा करत आहेत. यासंबंधी भारतीय लष्कराने अलर्ट दिला असून एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. भारतीय लष्कराने या व्हिडीओत मेसेजिंग अॅप वापरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. चार महिन्यांपुर्वी भारतीय लष्कराने वास्तविक नियंत्रण रेषेवर तैनात जवानांना व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेजिंग अॅपचा वापर करताना सुरक्षेची काळजी घेण्याचा आदेश दिला होता.


हा व्हिडीओ भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आला असून चायनीज डिजिटल वर्ल्ड भेदण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चिनी डिजिटल वर्ल्डमध्ये घुसखोरी करण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या मीडिअमचा वापर करत आहे. सध्या त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सिस्टीम हॅक करण्याची नवीन पद्धत अवलंबली आहे. तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये +86 पासून सुरु होणारे चिनी क्रमांक शिरकाव करतात आणि तुमचा डाटा चोरण्यास सुरुवात करत असल्याचे व्हिडीओत सांगण्यात आले आहे.

Leave a Comment