४५ टक्के भारतीय घेत आहेत झोपेसाठी ध्यानधारणेचा आधार


नवी दिल्ली – रात्री किमान ८ तासांची झोप प्रत्येक माणसाला निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असते. त्याला जर अशी झोप मिळाली नाही तर विकार जडण्याची शक्यता असते. पण ४५ टक्के भारतीय झोपेसाठी ध्यानधारणेचा आधार घेत असल्याची गंभीर बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. ‘फिलिप्स इंडिया सोसायटी’ने जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने अहवाल जारी केला. यात झोपेच्या सवयी, झोपेच्या वेळा तसेत झोपेत येणारे अडथळे या मुद्द्यांवर आधारित सर्वेक्षण करण्यात आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment