रशियन कंपनीने लाँच केला सोन्याचे बॅक कव्हर असलेला आयफोन एक्स


अॅपलने गेल्यावर्षी दशकपूर्तीनिमित्त आपला सर्वात महागडा असा आयफोन एक्स जगभरात लाँच केला. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना या फोनची किंमत न परवडणारीच आहे. या फोनची भारतीय बाजारपेठेत किंमत साधारण एक लाखांच्या आसपास जाते. पण कॅविअॅर या रशियन कंपनीने नुकताच सोन्याचे बॅक कव्हर असलेला आयफोन एक्स बाजारात लाँच केला आहे. मुळ आयफोन एक्सच्या तुलनेत याची किंमत दुप्पट आहे.

स्पेस ग्रे आणि व्हाईट अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन गेल्यावर्षी अॅपलने बाजारात दाखल केला होता. रशियन कंपनीने याच आयफोनला वेगळ्या रुपात बाजारात आणले आहे. २४ कॅरेट सोने वापरून तयार केलेला हा फोन क्लासिक गोल्ड आणि क्लासिक लिक्वेड गोल्ड अशा दोन रंगात बाजारात उपलब्ध आहे. बाजारात ज्याची किंमत साधारण मुळ किंमतीपेक्षाही दुप्पट आहे. हा फोन विकत घायचा झालाच साधारण पावणे तीन ते सव्वा तीन लाख रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे. साधारण २ लाख ९३ हजार रुपये क्लासिक गोल्ड आयफोन एक्सची किंमत आहे तर ३ लाख १२ हजारांहून अधिक क्लासिक लिक्वेड गोल्डची किंमत आहे.

Leave a Comment