‘या’वस्तू १ एप्रिल पासून महागणार


नवी दिल्ली – ३१ मार्चनंतर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणा-या काही वस्तू महाग होणार आहेत. काही वस्तू ३१ मार्चनंतर खरेदी करताना खिशाला कात्री लागणार आहे. नवे अर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या देशाच्या वार्षिक बजेटमध्ये अर्थमंत्री अरूण जेठली यांनी काही वस्तूवरचा कर वाढवला आहे.

या कराची वसूली नवीन अर्थिक वर्षामध्ये केली जाणार असल्यामुळे काही कंपन्या स्टॉक क्लिअर करण्याच्या प्रयत्नात आहेत. मोबाईल फोन व त्याचे पार्टसवर या अर्थसंकल्पात विक्री कर वाढवला आहे. सौदर्य प्रसाधने, सुगंधी अत्तर यामध्ये १० टक्यावरून २० टक्के कर वाढवला आहे. टी व्ही, एलईडी वर १५ टक्के कर केला आहे. इंपोर्टेड चप्पलवरील करता १० टक्यावरून २० टक्के केला आहे. सिगारेट, पान मसाले , तंबाखू यांच्यावर १२ टक्के कर लावला गेला आहे. तर दुचाकी, चार चाकी व त्यांचे पार्टस करात १५ ते २५ टक्के कर वाढवण्यात आला आहे.

मोबाईल फोन, सौदर्य प्रसाधने, तंबाखूजन्य पदार्थ, दुचाकी चारचाकी वाहने, इंपोर्टेड चप्पल, टि.व्ही, एलईडी, ट्रक- बस टायर्स, इमेंटीशन ज्वेलरी रेशमी कपडे , रत्न हिरे, आदी उत्पादने येत्या १ एप्रिल पासून खरेदी करताना ग्राहकाच्या खिशाला कात्री लागणार असल्यामुळे ३१ मार्चपुर्वी या वस्तू खरेदी करण्याची नामी संधी आहे.

Leave a Comment