अॅल्कलाईन डाएट म्हणजे काय?


अल्कलाईन डायट ‘ अॅसिड – अल्कली ‘ यांच्या प्रमाणवर आधारित असलेले डायट आहे. म्हणजे, आपण जेव्हा अन्न खातो, तेव्हा हे अन्न शरीरामध्ये विघटीत होते. परिणामस्वरूप, आपल्या शरीरामध्ये भोजनाच्या माध्यमातून आलेल्या रासायनिक तत्वांमुळे काही अनावश्यक प्रोडक्ट्स तयार होत असतात. ह्या प्रोडक्ट्सचे प्रमाण शरीरामध्ये वाढत गेले, तर ते निरनिराळ्या आजारांना आमंत्रण ठरू शकते. शरीरामध्ये अॅसिडची मात्र जास्त झाल्यास शरीरातील हाडांमधून कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अवशोषित केले जाऊन ऑस्टीयोपोरोसीस सारख्या व्याधी निर्माण होऊ शकतात. तसेच शरीरामध्ये अॅसिड्सचे प्रमाण वाढल्याने त्वचा पिवळसर दिसू लागते, नखे कमकुवत होऊन तुटू लागतात. शरीरामधील अॅसिड्स कमी करण्याचे काम अल्कली करीत असतात. त्यामुळे अल्कलाईन डायट घेणे आवश्यक ठरते.

ह्यासाठी आपला आहार न्युट्रल, म्हणजे ना जास्त अॅसिडीक, ना जास्त अल्कालाईन असा हवा. यासाठी आपल्या आहारामध्ये भरपूर फळे, ताज्या भाज्या, आणि वनस्पतींपासून मिळणारे पदार्थ यांचा समावेश करावा. तसेच पाणी पिण्याचे प्रमाण योग्य असणे ही आवश्यक आहे. मानसिक ताण, धुम्रपान, मद्यपान, चहा-कॉफीचे अतिसेवन, साखर, मैदा आणि मैद्याचे पदार्थ, इतर प्रोसेस्ड फूड्स यांच्या सेवनाने शरीरातील अॅसिड्सचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे ह्या पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

अश्या प्रकारचे डायट करण्याकरिता आपल्या आहारामध्ये तळलेल्या पदार्थांच्या ऐवजी ग्रिल्ड किंवा बेक्ड पदार्थ असावेत. तसेच वाफाविलेले, उकडलेले पदार्थ देखील चांगले. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी असावे. प्रोसेस्ड पदार्थ आणि मांस यांचे सेवन अतिशय नियंत्रित असावे. तेलांमध्ये कॉर्न, सुर्यफूल, किंवा ऑलिव्ह ऑईल यांचा वापर करावा. पॅकेज्ड फूड्स, किंवा अॅडीटीव्हज असलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे. ताज्या भाज्या आणि फळे यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आपल्या आहारामध्ये असावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment