बीएसएनएलची ‘लूट लो’ पोस्टपेड ऑफर


मुंबई : आपल्या ग्रांहकांसाठी बीएसएनएलने लूट लो पोस्टपेड ऑफर पुन्हा एकदा लाँच केली असून मार्चमध्ये या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

या नव्या ऑफरअंतर्गत ग्राहकांना प्रीमियम पोस्टपेड प्लान्सवर ६० टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे तसेच एक सिम कार्डही फ्रीमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर १०० टक्के अॅक्टिव्हेनश चार्ज मिळणार आहे. बीएसएनएलच्या नव्या आणि जुन्या पोस्टपेड ग्राहकांना ही ऑफर मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत नवे कनेक्शन घेणाऱ्यांना कोणतेही सिम एक्टिवेशन चार्ज लागणार नाही.

प्रीमियम पोस्टपेड प्लान १,५२५ रुपयांचा असेल तर यात ६० टक्के रेंटल डिस्काऊंट मिळू शकतो. या प्लानमध्ये अनलिमिडेट व्हॉईस कॉल, एसएमएस आणि डेटा दिला जातोय. दरम्यान, यासाठी १२,६ अथवा ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान निवडावा लागेल. तुम्हाला तेव्हा ६० टक्क्यांपर्यंत रेंटल डिस्काऊंट मिळेल. जर तुम्ही सहा महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर तुम्हाला ४५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर ३० टक्के डिस्काऊंट मिळेल. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अशाच प्रकारचा पोस्टपेड प्लान आणला होता. त्यानंतर मार्चमध्ये पुन्हा रिलाँच केला.

Leave a Comment