काही उपयोगी टिप्स


आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगाला येणाऱ्या काही टिप्स : – एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण टेबलावर स्थानापन्न झाल्यानंतर मेन्यू कार्ड मागवितो. आपल्या खाण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत, हे पाहण्यासाठी आपण काही वेळ हे मेन्यू कार्ड चाळतो. पण न्या मेन्यू कार्ड मुळे अनेक तऱ्हेच्या जंतूंचा प्रादुर्भाव होत असतो. अनेक लोकांचे हात त्या मेन्यू कार्डला लागत असतात, ती मेन्यू कार्ड अनेक ठिकाणी उचलून ठेवली जातात. त्यामुळे मेन्यू कार्डचा वापर करून झाल्यानंतर खाण्याला सुरुवात करण्यापूर्वी हात अवश्य धुवावेत.

कधी कधी अचानक खोकल्याची जोरदार उबळ येते आणि ढास लागते. खोकल्याची अचानक ढास लागल्यामुळे जीव घाबरा होऊ लागतो. अश्या वेळी थोडेसे पाणी प्यायल्याने ढास कमी होते. पण जर खोकल्याची ढास आली आणि आणि आसपास पाणी उपलब्ध नसेल, तर दोन्ही हात वर ताठ करा. त्यामुळे खोकल्याची उबळ त्वरित थांबेल.

अनेकदा गप्पा रंगल्या की जुने किस्से पुन्हा आठवणींमध्ये येतात. आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या विशेष घटनांबद्दल सांगणे आपल्याला सर्वांनाच आवडते. पण काही व्यक्ती हे किस्से रंगवून सांगताना, काही वेळा न घडलेल्या गोष्टी देखील सांगत असतात. हे मानसिकता मानसशास्त्रज्ञांनी ओळखून एक निदान केले. ते असे, की एखादी व्यक्ती जर सत्यघटना कथन करीत असेल, तर ती व्यक्ती बोलताना सतत हातवारे करीत असते. पण एखादी व्यक्ती जर काल्पनिक कथा वास्तव म्हणून सांगत असेल, तर त्या व्यक्तीचे हात अतिशय स्थिर असतात असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

सर्दी किंवा खोकला झालेला असताना एखादे औषध घेण्यापेक्षा अननसाचा रस घ्यावा. हा रस सर्दीवरील औषधाच्या पेक्षा अधिक गुणकारी आहे. ह्या रसाच्या सेवनाने सर्दी, फ्लू टाळता येऊ शकतात.

अनेकदा आपल्या घरातील घड्याळ बंद पडले, किंवा टीव्हीचा रिमोट कंट्रोल चालेनासा झाला की त्यामधील cells संपले असावेत असे वाटते. पण सेल्स चांगले आहेत किंवा नाही हे कसे ओळखायचे? तर हे सेल्स जमिनीपासून काही उंचीवर धरून जमिनीवर टाकावेत. जर हे सेल चांगले असतील, तर ते जमिनीवर एकदाच ‘बाउन्स’ होतील. जर एकापेक्षा अधिक वेळा सेल्स बाउन्स झाले, तर ते निकामी आहेत असे समजावे.

Leave a Comment